
IPO GMP | जर तुम्ही आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. या आठवड्यात आणखी एक आयपीओ सब्सक्रिप्शनसाठी खुला होणार आहे. हा आयपीओ डिफेन्स संबंधित कंपनीचा असल्याने तेजीने परतावा मिळू शकतो असे संकेत मिळत आहेत. सीटूसी अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड कंपनीचा आहे.
सीटूसी अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड कंपनीचा आयपीओ २२ नोव्हेंबरला गुंतवणुकीसाठी खुला होईल आहे. या IPO मध्ये २६ नोव्हेंबरपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. सीटूसी अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड कंपनीचा आयपीओसाठी २१४ ते २२६ रुपये प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे.
ग्रे मार्केटमध्ये तेजी
सीटूसी अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड कंपनीचा आयपीओ 99 कोटी रुपयांचा आहे. ज्यात सीटूसी अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड कंपनीने केवळ 43.83 लाख इक्विटी शेअर्सचा नवीन इश्यू समाविष्ट केला आहे. या आयपीओ’मधील ५०% हिस्सा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी, ३५ टक्के रिटेल गुंतवणूकदारांसाठी आणि उर्वरित १५% बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. सीटूसी अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये आधीच २२० रुपयांच्या प्रीमियमवर उपलब्ध आहेत. म्हणजेच स्टॉक मार्केटमध्ये सूचिबद्ध होताच ९८% परतावा मिळू शकतो.
कंपनी व्यवसाय
सीटूसी अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड कंपनी प्रोसेसर, पॉवर, रडार अँड मायक्रोवेव्ह, रेडिओ फ्रिक्वेन्सी (आरएफ), एम्बेडेड सॉफ्टवेअर आणि फर्मवेअर सह स्ट्रॅटेजिक डिफेन्स सोल्यूशन्सच्या संपूर्ण स्पेक्ट्रमसाठी डिझाइन सेवा प्रदान करते. पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज कंपनीसोबत स्पर्धा करणाऱ्या सीटूसी कंपनीची सप्टेंबर २०२४ पर्यंत ५०.५६ कोटी रुपयांची ऑर्डर बुक आहे.
कंपनीची आर्थिक स्थिती
मागील काही वर्षांत सीटूसी अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड कंपनीची आर्थिक कामगिरी मजबूत होती आणि आर्थिक वर्ष २०२४ मध्ये नफा वाढून १२.३ कोटी रुपयांवर पोहोचला, जो मागील वर्षीच्या २.९ कोटी रुपयांच्या तुलनेत लक्षणीय आहे. याच कालावधीत सीटूसी अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड कंपनीचा महसूल आर्थिक वर्ष २०१३ मधील ८.०५ कोटी रुपयांवरून अनेक पटींनी वाढून ४१.०६ कोटी रुपये झाला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.