30 November 2023 5:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्स पुन्हा तेजीत, शेअर्समधील तेजी कायम राहणार का? तपशील जाणून घ्या Multibagger Stocks | मार्ग श्रीमंतीचा! मल्टिबॅगर शेअरने 5 दिवसांत दिला 22 टक्के परतावा, पैसा वेगात वाढतोय Gold Rate Today | अरे देवा! आजही सोन्याचे भाव मजबूत वाढले, लग्नकार्याच्या दिवसात सोन्याचा दर किती महाग होणार? Zomato Share Price | झोमॅटो शेअर मालामाल करतोय, 10 महिन्यांत दिला 150% परतावा, शेअरची किंमत उच्चांकी पातळीवर Aster DM Share Price | 1 दिवसात 20 टक्के परतावा देणाऱ्या एस्टर डीएम हेल्थकेअर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, नेमकं कारण काय? OK Play Share Price | मल्टिबॅगर शेअर! ओके प्ले इंडिया शेअर्स पैसा गुणाकारात वाढवत आहेत, स्टॉक तपशील सेव्ह करा 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! पगारात होणार मोठी वाढ, आठव्या वेतन आयोगासंदर्भात महत्त्वाचे अपडेट
x

LIC Share Price | एलआयसी शेअर्स पुन्हा तेजीत येणार? तज्ज्ञांनी जाहीर केली शेअरची टार्गेट प्राईस, 40 टक्के परतावा मिळणार?

LIC Share Price

LIC Share Price | चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर एलआयसी कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. या तिमाहीत कंपनीच्या प्रीमियम उत्पन्नात घट झाल्यामुळे कंपनीचे शेअर्स तिमाही निकाल कमजोर आले आहेत. मात्र एलआयसी कंपनीच्या मार्जिनमध्ये सुधारणा पाहायला मिळाली आहे.

ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालच्या तज्ञांनी एलआयसी स्टॉकवर 850 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. म्हणजेच सध्याच्या किमतीच्या तुलनेत हा स्टॉक गुंतवणुकदारांना 40 टक्के नफा देऊ शकतो. शुक्रवार दिनांक17 नोव्हेंबर 2023 रोजी एलआयसी स्टॉक 0.84 टक्क्यांच्या वाढीसह 614.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 20 नोव्हेंबर 2023 रोजी एलआयसी स्टॉक 0.59 टक्के घसरणीसह 611.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

एलआयसी कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 च्या एप्रिल ते सप्टेंबर 2023 या पहिल्या सहामाहीत 17,469 कोटी रुपये PAT नोंदवला आहे. यामध्ये 13,768 कोटी कर उत्पन्न आहे. 30 सप्टेंबर 2023 रोजी संपलेल्या सहामाहीमध्ये एलआयसी कंपनीने वैयक्तिक व्यवसायात 40.35 टक्के बाजार हिस्सा काबीज केला आहे. तर समूह व्यवसायात कंपनीने 70.26 टक्के वाटा काबीज केला आहे. एलआयसी कंपनीचा नॉन-पॅर एपीई 19.77 टक्क्यांच्या वाढीसह 1,575 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

भारतीय एम्बेडेड मूल्य 21.74 टक्क्यांच्या वाढीसह 6.62 लाख कोटी रुपये नोंदवले गेले आहे. तर कंपनीचा नेट VNB मार्जिन 14.6 टक्के नोंदवला गेला आहे. सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा AUM 10.47 टक्क्यांच्या वाढीसह 47.43 लाख कोटी रुपये नोंदवला गेला आहे. तर 13 व्या महिन्यात कंपनीचा प्रीमियम आणि पॉलिसीचा फायनल सॉल्व्हेंसी रेशो 1.88 वरून वाढून 1.90 वर गेला आहे.

सप्टेंबर 2023 तिमाहीच्या निकालानंतर, ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, एलआयसी कंपनीकडे आपले उद्योग-अग्रणी स्थान टिकवून ठेवून अत्यंत फायदेशीर उत्पादन विभागांमध्ये वाढ सध्या करण्याची क्षमता आहे. एवढ्या मोठ्या कंपनीला चांगल्या आणि विचारपूर्वक योजनांची अंमलबजावणी करण्याची गरज आहे.

तज्ञांनी आपल्या दुसर्‍या अहवालात म्हंटले आहे की, सप्टेंबर तिमाहीत एलआयसी प्रीमियम उत्पन्नात घसरण झाली आहे. मुख्यत्वे गट विमा व्यवसायातील घसरणीमुळे कंपनीचा वैयक्तिक व्यवसाय स्थिर राहिला आहे. आर्थिक वर्ष 2023-25 साठी तज्ञांनी एलआयसी स्टॉकवर 646 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. आणि स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | LIC Share Price NSE 20 November 2023.

हॅशटॅग्स

#LIC Share Price(79)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x