12 December 2024 3:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे
x

Alok Industries Share Price | मोठी संधी! मुकेश अंबानींच्या रिलायन्सकडे या कंपनीचा मोठा हिस्सा, 13 रुपयाचा शेअर मालामाल करणार

Alok Industries Share Price

Alok Industries Share Price | एकीकडे जागतिक नकारात्मक भावनांमुळे शेअर बाजार अस्थिर आहे, ते दुसरीकडे ‘आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीच्या शेअरमध्ये वाढ पाहायला मिळत आहे. गुरुवार दिनांक 16 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.35 टक्के वाढीसह 13.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 11 टक्क्यांच्या वाढीसह 13.67 रुपयेवर ट्रेड करत होते. नंतर प्रॉफिट बुक होऊनही शेअरची किंमत 13 रुपयांच्या वर टिकुन राहिली होती. 11 एप्रिल 2022 रोजी ‘आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 29.80 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. 22 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 10.07 रुपये या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर पोहचले होते. (Alok Industries Limited)

आलोक इंडस्ट्रीज कंपनीच्या स्टॉकचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, बीएसई निर्देशांकावर सेन्सेक्सच्या तुलनेत एका वर्षात ‘आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने नकारात्मक परतावा दिला आहे. मागील एका वर्षात ‘आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने लोकांना 46.41 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. त्याच वेळी मागील सहा महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 33.59 टक्के घसरले आहेत. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज ग्रुपने 2019 मध्ये आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे भाग भांडवल 5,000 कोटी रुपयांना खरेदी केले होते. आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे उत्पादन केंद्र सिल्वासा, वापी, नवी मुंबई, भिवंडी या ठिकाणी स्थित आहे. या उत्पादन केंद्रांची क्षमता वार्षिक 68,000 टन कापूस धागा आणि 1.7 लाख टन पॉलिस्टर उत्पादनाची आहे.

मुकेश अंबानी यांच्या ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ ग्रुपने कापड व्यवसायात वर्चस्व निर्माण करायला सुरुवात केली आहे. रिलायन्स ग्रुपची पूर्ण मालकीची उपकंपनी ‘रिलायन्स पॉलिस्टर लिमिटेड’ ने ‘शुभलक्ष्मी पॉलिस्टर्स लिमिटेड’, आणि ‘शुभलक्ष्मी पॉलिटेक्स लिमिटेड’ या कंपनीच्या पॉलिस्टर व्यवसायाचे देखील अधिग्रहण केले आहे. शुभलक्ष्मी पॉलिस्टर्स कंपनीचे गुजरात मधील दहेज या ठिकाणी आणि सिल्वासा येथे दोन उत्पादन केंद्र काम करत आहेत. ‘शुभलक्ष्मी पॉलिटेक्स’ कंपनीचे दहेज येथे उत्पादन युनिट चालू आहे. यापूर्वी, रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने सींटेक्स इंडस्ट्रीज कंपनीचे अधिग्रहण केले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Alok Industries Share Price 521070 return on investment check details on 16 march 2023.

हॅशटॅग्स

Alok Industries Share Price(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x