
IPO GMP | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला इफ्वा इन्फ्रा IPO बाबत माहिती देणार आहोत. या कंपनीचा IPO शुक्रवार 5 जुलै ते 9 जुलै 2024 पर्यंत गुंतवणूकीसाठी खुला असेल. ( इफ्वा इन्फ्रा कंपनी अंश )
आपल्या IPO मध्ये कंपनीने शेअरची किंमत बँड 78 रुपये ते 82 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. या स्टॉकची फ्लोर प्राईज शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या 7.8 पट अधिक आहे. आणि कॅप प्राईज शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या 8.2 पट अधिक आहे. ग्रे मार्केट तज्ञांच्या मते, इफ्वा इन्फ्रा स्टॉक सध्या ग्रे मार्केटमध्ये 140 टक्के प्रीमियम वाढीसह ट्रेड करत आहे.
ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, इफ्वा इन्फ्रा कंपनीचा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 115 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच हा स्टॉक आपल्या गुंतवणुकदारांना पहिल्याच दिवशी 82 रुपये या अप्पर प्राइस बँडच्या तुलनेत 140.24 टक्के परतावा कमावून देऊ शकतो. तज्ञांच्या मते, हा स्टॉक 197 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो.
इफ्वा इन्फ्रा कंपनीने आपल्या IPO मधे पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी 50 टक्के कोटा राखीव ठेवला आहे. तर 35 टक्के कोटा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला आहे. या कंपनीने 15 टक्के कोटा गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला आहे. या IPO मध्ये मार्केट मेकरसाठी कंपनीने 3,24,800 इक्विटी शेअर्स म्हणजेच 5.19 टक्के कोटा राखीव ठेवण्यात आला आहे.
इफ्वा इन्फ्रा ही कंपनी मुख्यतः घनकचरा प्रक्रिया आणि विल्हेवाट, वायुवीजन प्रणाल, घातक कचरा व्यवस्थापन,. जल प्रक्रिया प्रकल्प, औद्योगिक आणि सांडपाणी प्रक्रिया, अभियांत्रिकी, सल्लागार, खरेदी, बांधकाम आणि जल प्रदूषण नियंत्रणासाठी एकात्मिक प्रकल्प व्यवस्थापन सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. इफ्वा इन्फ्रा अँड रिसर्च कंपनीने मार्च 2024 तिमाहीत महसूल संकलनात 26.08 टक्के वाढ झाल्याची माहिती दिली होती. मार्च 2024 तिमाहीत या कंपनीने PAT मध्ये 169 टक्के वाढ नोंदवली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.