 
						IPO GMP | निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स लिमिटेड कंपनी आयपीओ ७ नोव्हेंबरला गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स लिमिटेड कंपनीने आयपीओसाठी 70 ते 74 रुपये प्राईस बँड निश्चित केली आहे. निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स लिमिटेड कंपनी आयपीओचा आकार २२०० कोटी रुपये आहे.
निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स लिमिटेड कंपनी IPO मध्ये फ्रेश इक्विटी शेअर्सव्यतिरिक्त ऑफर फॉर सेल (OFS) देखील आहे. निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स लिमिटेड कंपनी आयपीओ ६ नोव्हेंबरला अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला होईल. निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स १४ नोव्हेंबरला एनएसई आणि बीएसईवर लिस्ट होतील.
आयपीओबद्दल
निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स लिमिटेड कंपनीने आयपीओच्या माध्यमातून २२०० कोटी रुपये उभे करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स लिमिटेड कंपनी IPO मध्ये ८०० कोटी रुपयांचे नवे इक्विटी शेअर्स जारी केले जातील. निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स लिमिटेड कंपनी IPO मध्ये १४०० कोटी रुपयांची ऑफर फॉर सेल आहे. निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स लिमिटेड कंपनी आयपीओ 7 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहणार आहे. तसेच १२ नोव्हेंबरला शेअर्सचे वाटप करण्यात येणार आहे.
कोणासाठी किती राखीव आहे?
निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स लिमिटेड कंपनीच्या आयपीओपैकी ३५% हिस्सा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. यापैकी ५०% हिस्सा पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी, तर १५% बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
आयपीओचे रजिस्ट्रार आणि प्रमुख व्यवस्थापक
मॉर्गन स्टॅनली इंडिया कंपनी, आयसीआयसीआय सिक्युरिटीज, कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी, AXIS कॅपिटल, मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स आणि एचडीएफसी बँक हे निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स लिमिटेड कंपनी आयपीओचे प्रमुख व्यवस्थापक आहेत. तसेच केफिन टेक्नॉलॉजीज कंपनी या ऑफरचे रजिस्ट्रार आहे.
कंपनी हा निधी कुठे वापरणार
निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स लिमिटेड कंपनी आयपीओच्या 800 कोटी रुपयांच्या उत्पन्नाचा वापर भांडवली आधार मजबूत करण्यासाठी आणि सॉल्व्हन्सी पातळी राखण्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी करेल अशी माहिती देण्यात आली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		