 
						IPO GMP | आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मागील वर्षाभरात अनेक IPO ने गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा दिला आहे. ओनिक्स बायोटेक लिमिटेड कंपनी आयपीओ लाँच होणार आहे. ओनिक्स बायोटेक लिमिटेड कंपनी आयपीओ १३ नोव्हेंबरपासून गुंतवणुकीसाठी खुला होणार होणार. तसेच या आयपीओ’साठी गुंतवणूकदार १८ नोव्हेंबरपर्यंत गुंतवणूक करू शकतात.
आयपीओसाठी प्राइस बँड
ओनिक्स बायोटेक लिमिटेड कंपनी आयपीओसाठी ६१ रुपये प्राइस बँड निश्चित करण्यात आली आहे. ओनिक्स बायोटेक लिमिटेड कंपनी आयपीओ शेअर ग्रे मार्केटमध्ये प्रीमियमवर ट्रेड करतोय. म्हणजेच ओनिक्स बायोटेक लिमिटेड कंपनी आयपीओ सूचिबद्ध होण्याच्या पहिल्याच दिवशी मोठा परतावा देऊ शकतो असे संकेत मिळत आहेत.
काय आहे सविस्तर
ओनिक्स बायोटेक लिमिटेड कंपनी आयपीओमध्ये २९.३४ कोटी रुपयांच्या ४८.१० लाख शेअर्सचा नव्याने इश्यू करण्यात येणार आहे. त्यामुळे ओनिक्स बायोटेक लिमिटेड कंपनी आयपीओमधून जमा झालेली रक्कम (ऑफर खर्च वगळून) कंपनीकडेच राहणार आहे. ओनिक्स बायोटेक लिमिटेड कंपनी आयपीओसाठी किरकोळ गुंतवणूकदार कमीत कमी आणि जास्तीत जास्त 2,000 इक्विटी शेअर्ससाठी बोली लावू शकतात. त्यामुळे गुंतवणूकदारांना 1.22 लाख रुपये गुंतवता येतील आहे.
कंपनी पैशाचा वापर कुठे करणार
ओनिक्स बायोटेक लिमिटेड कंपनी आयपीओ मार्फत मिळणाऱ्या निधीतील ६.०८ कोटी रुपये सध्याच्या उत्पादनात सुधारणा करण्यासाठी खर्च करणार आहे. तसेच ड्राय पावडर इंजेक्शनसाठी सध्याच्या उत्पादनात हायस्पीड कार्टनिंग पॅकेजिंग लाइन उभारण्यासाठी १.२४ कोटी रुपये वापरण्याचा ओनिक्स बायोटेक लिमिटेड कंपनी कंपनीचा मानस आहे. आणि १२ कोटी रुपये कर्ज फेडण्यासाठी वापरले जाणार आहेत. ओनिक्स बायोटेक लिमिटेड कंपनी उरलेली रक्कम सामान्य कॉर्पोरेट कामांसाठी खर्च करणार आहे.
कंपनी व्यवसाय
ओनिक्स बायोटेक लिमिटेड कंपनी हिमाचल प्रदेशात दोन उत्पादन सुविधांसह, ऑनिक्स बायोटेक ड्राय पावडर इंजेक्शन आणि कोरडे सिरप ऑफर करणारी फार्मास्युटिकल कॉन्ट्रॅक्ट उत्पादक म्हणून कार्य करते. ओनिक्स बायोटेक लिमिटेड कंपनी कंपनीच्या ग्राहकांमध्ये हेटेरो हेल्थकेअर, मॅनकाइंड फार्मा, सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज, मॅकलिओड्स फार्मास्युटिकल्स, माप्रा लॅबोरेटरीज, अरिस्टो फार्मास्युटिकल्स, एफडीसी, एक्सा पॅरेंट्रल्स, झुव्हेंटस हेल्थकेअर, एक्कॉम ड्रग्स आणि फार्मास्युटिकल्स या कंपन्यांचा समावेश आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		