
IPO GMP | आज सात करतार शॉपिंग लिमिटेड कंपनीचा गुंतवणूकदारांसाठी खुला झाला आहे. सात करतार शॉपिंग लिमिटेड कंपनी आयपीओ पूर्णपणे फ्रेश शेअर्सवर आधारित आहे. सात करतार शॉपिंग लिमिटेड कंपनी या आयपीओच्या माध्यमातून ४१.७३ लाख नवे शेअर्स जारी करणार आहे. सात करतार शॉपिंग लिमिटेड कंपनी या आयपीओच्या माध्यमातून ३३.८० कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे. हा आयपीओ १४ जानेवारी २०२५ पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल.
आयपीओ शेअर प्राइस बँड किती आहे
सात करतार शॉपिंग लिमिटेड कंपनी आयपीओसाठी ७७ ते ८१ रुपये प्रति शेअर प्राइस बँड निश्चित करण्यात आली आहे. या आयपीओच्या एका लॉट मध्ये १६०० शेअर्स मिळतील. म्हणजे रिटेल गुंतवणूकदारांना किमान १ लाख २९ हजार ६०० लाख रुपयांची बोली लावावी लागणार आहे. सात करतार शॉपिंग लिमिटेड कंपनी आयपीओ शेअर १७ जानेवारीला शेअर बाजारात सूचिबद्ध करण्यात येणार आहे. या कंपनीचा शेअर एनएसई एसएमईवर सूचिबद्ध करण्यात येणार आहे.
सात करतार शॉपिंग लिमिटेड कंपनी आयपीओमध्ये ५० टक्के हिस्सा पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. तर रिटेल गुंतवणूकदारांसाठी किमान ३५ टक्के हिस्सा राखीव असेल. तसेच १५ टक्के हिस्सा एनआयआयसाठी राखीव असेल.
शेअर ग्रे-मार्केटमध्ये तेजीत
इन्व्हेस्टर्स गेनच्या रिपोर्टनुसार, सात करतार शॉपिंग आयपीओ शेअर अनलिस्टेड म्हणजे ग्रे-मार्केटमध्ये तेजीत आहे. या आयपीओचा शेअर आजच्या तारखेला २५ रुपयांच्या जीएमपीवर ट्रेड करत आहे. हाच ट्रेंड कायम राहिल्यास हा शेअर १०० रुपयांच्या पुढे सूचिबद्ध होऊ शकतो.
कंपनीबद्दल जाणून घ्या
सात करतार शॉपिंग लिमिटेड ही आयुर्वेद क्षेत्रात कार्यरत असलेली कंपनी आहे. सात करतार शॉपिंग लिमिटेड कंपनी विविध आजारांवरील औषधांचे उत्पादन देखील करते. कंपनी आपल्या उत्पादनांची विक्री ऑनलाइन विकते (ज्यात त्यांची वेबसाइट आणि ईकॉमर्स प्लॅटफॉर्म समाविष्ट आहे).
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.