
IPO GMP | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आली आहे. लवकरच एसआरएम कॉन्ट्रॅक्टर कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. बांधकाम क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या एसआरएम कॉन्ट्रॅक्टर कंपनीचा IPO मागील आठवड्यात गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. ( एसआरएम कन्स्ट्रक्टर्स कंपनी अंश )
एसआरएम कन्स्ट्रक्टर्स कंपनीने अँकर गुंतवणूकदारांच्या माध्यमातून 39 कोटी रुपये रक्कम जमा केली आहे. या कंपनीचे IPO शेअर्स ग्रे मार्केटमध्ये शानदार कामगिरी करत आहेत. या कंपनीने अँकर गुंतवणूकदारांना 210 रुपये प्रति शेअर किमतीवर 18,59,900 शेअर्स इश्यू केले आहेत.
एसआरएम कॉन्ट्रॅक्टर कंपनीचा IPO 26 मार्च ते 28 मार्च दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची किंमत बँड 200 ते 210 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. कंपनीने आपल्या एका IPO लॉटमध्ये 70 शेअर्स ठेवले जातात. हा एक लॉट खरेदी करण्यासाठी किरकोळ गुंतवणुकदारांना 14,700 रुपये जमा करावे लागतील.
ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, एसआरएम कॉन्ट्रॅक्टर कंपनीचे IPO शेअर्स मागील आठवड्यात शनिवारी 58 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते. जर हा स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 58 रुपये किमतीवर टिकला तर शेअर्स 268 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात.
या कंपनीने आपल्या IPO मध्ये 35 टक्के कोटा रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला आहे. कंपनीचे IPO शेअर्स 1 एप्रिल रोजी वाटप केले जाऊ शकतात. 3 एप्रिल रोजी कंपनीचा IPO स्टॉक सूचीबद्ध केला जाईल. या कंपनीचे शेअर्स BSE आणि NSE मध्ये सूचीबद्ध केले केले जातील.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.