
IPO GMP | युनिमॅक एरोस्पेस लिमिटेड कंपनी आयपीओ 23 डिसेंबर 2024 रोजी गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. हा आयपीओ 26 डिसेंबरपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. युनिमॅक एरोस्पेस लिमिटेड कंपनी आयपीओची ग्रे-मार्केटमध्ये जबरदस्त चर्चा सुरु आहे.
आयपीओ शेअर ग्रे-मार्केटमध्ये तेजीत
युनिमॅक एरोस्पेस लिमिटेड कंपनी आयपीओ शेअर ग्रे मार्केटमध्ये ६० टक्क्यांहून अधिक प्रीमियमवर ट्रेड करत आहे. युनिमॅक एरोस्पेस लिमिटेड कंपनी या आयपीओमार्फत ५०० कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे. युनिमॅक एरोस्पेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स एनएसई आणि बीएसईवर सूचिबद्ध करण्यात येणार आहे.
जीएमपी’नुसार शेअर 1265 रुपयांवर सूचिबद्ध होतोय
युनिमेक एरोस्पेसच्या आयपीओ शेअर प्राईस बँड ७८५ रुपये निश्चित करण्यात आली आहे. मात्र अनलिस्टेड मार्केटमध्ये म्हणजे ग्रे-मार्केटमध्ये आयपीओ कंपनी शेअर्स 480 रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत होते. म्हणजे युनिमेक एअरोस्पेस कंपनी शेअर १,२६५ रुपयांवर सूचिबद्ध होऊ शकतो असे संकेत मिळत आहेत. याचा अर्थ गुंतवणूकदारांना शेअर सूचिबद्ध होण्याच्या पहिल्या दिवशीच ६१ टक्क्यांहून अधिक परतावा मिळू शकतो. युनिमॅक एअरोस्पेस कंपनी शेअर्स ३१ डिसेंबर २०२४ रोजी शेअर बाजारात सूचिबद्ध होणार आहेत. युनिमॅक एअरोस्पेस कंपनी आयपीओ शेअर्सचे अलॉटमेंट २७ डिसेंबर २०२४ रोजी अंतिम होईल.
गुंतवणूकदार कमीत कमी एक लॉट आणि जास्तीत जास्त १३ लॉटसाठी बोली लावू शकतात
युनिमेच एअरोस्पेस लिमिटेड कंपनी आयपीओ’मध्ये रिटेल गुंतवणूकदार कमीत कमी एक लॉट आणि जास्तीत जास्त १३ लॉटसाठी बोली लावू शकतात. आयपीओच्या एका लॉटमध्ये एकूण १९ शेअर्स मिळतील. म्हणजेच रिटेल गुंतवणूकदारांना 1 लॉटसाठी 14915 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
कंपनीबद्दल
युनिमॅक एअरोस्पेस लिमिटेड कंपनी २०१६ मध्ये स्थापन करण्यात आली होती. युनिमॅक एअरोस्पेस लिमिटेड कंपनी मेकॅनिकल असेंब्ली, इलेक्ट्रो-मेकॅनिकल सिस्टम आणि एरोइंजिन आणि एअर-फ्रेम संबंधित उत्पादनं तयार करते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.