
IPO GMP | या महिन्यात लाँच करण्यात आलेल्या आयपीओ’मधून गुंतवणूकदारांची मोठी कमाई झाली आहे. आता अजून एका कंपनीचा आयपीओ लाँच होणार आहे. युनिमेक एरोस्पेस अँड मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेड कंपनीचा आहे. युनिमेक एरोस्पेस अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा आयपीओ २३ डिसेंबर पासून गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. युनिमेक एरोस्पेस कंपनीच्या आयपीओ’साठी २६ डिसेंबरपर्यंत बोली लावता येणार आहे. युनिमेक एरोस्पेस आयपीओ’साठी ७४५ ते ७८५ रुपये प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे.
आयपीओ 500 कोटींचा
युनिमेक एरोस्पेस अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आयपीओमध्ये फ्रेश इश्यू आणि ओएफएस या दोन्हीचा समावेश आहे. युनिमेक एरोस्पेस अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी या आयपीओ’मार्फत ५०० कोटी रुपये उभारणार आहे.
कंपनी आयपीओ निधीचा वापर कशासाठी करणार
युनिमेक एरोस्पेस अँड मॅन्युफॅक्चरिंग आयपीओ’मध्ये पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी ५० टक्के, रिटेल गुंतवणूकदारांसाठी ३५% आणि बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी १५% हिस्सा राखीव ठेवण्यात आले आहे. कंपनी या आयपीओ’मार्फत जमा होणाऱ्या निधीचा वापर कर्ज फेडण्यासाठी करणार आहे. युनिमेक एरोस्पेस अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी डिफेन्स आणि इतर क्षेत्रांसाठी पार्ट्स बनवते.
कंपनी आयपीओ जीएमपी किती आहे?
इन्व्हेस्टरगेन डॉटकॉमने दिलेल्या अपडेटनुसार, ‘युनिमेक एरोस्पेस अँड मॅन्युफॅक्चरिंग आयपीओचा ग्रे मार्केट प्रीमियम ३५० रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच कंपनीचे शेअर्स ११३५ रुपयांवर सूचिबद्ध होऊ शकतात. म्हणजे शेअर सूचिबद्ध होण्याच्या दिवशी गुंतवणूकदारांना कमीतकमी 45% परतावा मिळू शकतो.
रिटेल गुंतवणूकदारांना किमान 14,915 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल
युनिमेक एरोस्पेस अँड मॅन्युफॅक्चरिंग आयपीओसाठी शेअर्सचे अलॉटमेंट शुक्रवार, 27 डिसेंबर 2024 रोजी अंतिम होण्याची शक्यता आहे. मंगळवार, 31 डिसेंबर 2024 रोजी बीएसई आणि एनएसई वर शेअर्स सूचिबद्ध होऊ शकतात. रिटेल गुंतवणूकदार एका लॉटमध्ये 19 शेअर्स मिळतील आणि त्यासाठी किमान 14,915 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.