 
						IPO GMP | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. व्हीएल इंफ्राप्रोजेक्ट्स कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला असून लोकांनी या IPO ला भरघोस प्रतिसाद दिला आहे. ( व्हीएल इन्फ्रा कंपनी अंश )
या कंपनीचा IPO आज मंगळवार दिनांक 23 जुलैपासून ते 25 जुलैपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 39 ते 42 रुपये दरम्यान निश्चित केली आहे.
ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, व्हीएल इंफ्राप्रोजेक्ट्स स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 50 रुपये प्रीमियम वाढीसह ट्रेड करत आहे. या कंपनीने आपल्या एका IPO लॉटमध्ये 3000 शेअर्स ठेवले आहेत. किरकोळ गुंतवणूकदारांना एक लॉट खरेदी करण्यासाठी किमान 1,26,000 रुपये जमा करावे लागतील.
व्हीएल इंफ्राप्रोजेक्ट्स ही कंपनी 26 जुलै रोजी गुंतवणुकदारांना शेअर्स वाटप करेल. आणि 30 जुलै 2024 रोजी हा IPO स्टॉक शेअर बाजारात सूचीबद्ध केला जाईल. या कंपनीने 22 जुलै रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी आयपीओ खुला केला होता. या कंपनीने अँकर गुंतवणूकदारांना 42 रुपये किमतीवर स्टॉक जारी केला आहे.
व्हीएल इन्फ्रा कंपनीच्या IPO चा आकार 18.52 कोटी रुपये आहे. या कंपनीचा IPO पूर्णपणे फ्रेश इश्यू असेल. ही कंपनी आपल्या IPO द्वारे 44.10 लाख फ्रेश शेअर्स जारी करणार आहे. आयपीओपूर्वी या कंपनीच्या प्रवर्तकांकडे 90.91 टक्के भाग भांडवल होते. कंपनीने IPO मध्ये 35 टक्के कोटा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		