27 March 2023 10:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Calculator | 1000 रुपयांच्या एसआयपीने 50 लाख मिळतील, एसआयपी कॅल्क्युलेटरने समजून घ्या फायदा New Tax Calculator | पगार वार्षिक 10 लाख रुपये, नवीन विरुद्ध जुनी टॅक्स व्यवस्था, किती टॅक्स भरावा लागेल पाहा PPF Calculator | जर PPF मध्ये दरमहा 10,000 रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीला किती मोठी रक्कम मिळेल? गणना समजून घ्या ITR Filing 2023 | 1 एप्रिलपासून करदात्यांना ITR फाईल करता येणार, कोणते नवे फायदे मिळतील पहा SIP Calculator | स्वतःच 1 कोटींचं घर घ्यायचं असल्यास किती SIP करून शक्य होईल? फायद्याचं गणित समजून घ्या Viral Video | अर्रर्रर्र!! गायीला वाचवायला नाल्यात उतरला आणि पुढे काय झाल ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही   Raymond Share Price | रेमंड शेअर्स तेजीत येतं आहेत, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, स्टॉकची टार्गेट प्राईस पहा
x

IPO Investment | IPO खुला होताच 30 टक्के परतावा, पहिल्याच दिवसापासून या शेअरच्या गुंतवणूकदारांची जोरदार कमाई सुरु

IPO investment

IPO Investment | शेअर बाजारात बऱ्याच अवधी नंतर चांगल्या IPO ने एन्ट्री घेतली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आपला नुकसानही भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. असाच एक IPO रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपनीने आणला होता, आणि त्याच्या लिस्टिंगच्या दिवशी स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. ही कंपनी आहे शांतिदूत इन्फ्रा सर्व्हिसेस लिमिटेड.

शांतिदूत इन्फ्रा सर्व्हिसेसचे शेअर्स BSE निर्देशांकावर SME एक्सचेंजवर सुमारे 30 टक्के प्रीमियमसह 105 रुपयांच्या किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. कंपनीने IPO मध्ये आपल्या शेअरचे वितरण 81 रुपये प्रती शेअर या इश्यू किमतीवर केले आहे. लिस्टिंग झाल्यानंतर थोड्याच वेळात, कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर SME एक्सचेंजमध्ये अपर सर्किटवर जाऊन पोहोचले आणि त्यावेळी शेअर ची किंमत 110.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होती.

IPO ची विभागणी :
शांतिदूत इन्फ्रा सर्व्हिसेसच्या IPO इश्यू मध्ये 4.02 कोटी रुपयांचा वाटा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आला होता. त्यापैकी किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा 3 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. 9 सप्टेंबर 2022 रोजी शांतिदूत इन्फ्रा सर्व्हिसेसचा IPO गुंतवणूकदारांना बोली लावण्यासाठी खुला करण्यात आला होता. IPO बोली साठी खुला केल्यावर 4 दिवसात 2.85 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी जो कोटा राखून ठेवण्यात आला होता तो भाग 3.33 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. या आयपीओचे अधिकृत निबंधक म्हणून बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडने जबाबदारी पर पडली होती. बिहारस्थित या कंपनीने 81 रुपये प्रति शेअर दराने IPO बाजारात आणला होता. आणि त्याला गुंतवणूकदारांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला आहे.

IPO नंतर प्रमोटर्सची शेअरहोल्डिंग पॅटर्न :
शांतिदूत इन्फ्रा सर्व्हिसेसचा हा IPO पूर्णतः ऑफर फॉर सेल साठी जाहीर करण्यात आला आहे. कारण कंपनीला नवीन शेअर्स इश्यूद्वारे 2.01 कोटी रुपये आणि ऑफर फॉर सेल द्वारे 2.01 कोटी रुपये भांडवल उभारायचे होते. अविजित कुमार हेशांतिदूत इन्फ्रा सर्व्हिसेस कंपनीचे प्रमोटर आहेत. शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध झाल्यावर कंपनीमध्ये प्रमोटर्सची शेअरहोल्डिंग 99.60 टक्क्यांवरून 72.07 टक्क्यांवर खाली येईल. मागील 3 आर्थिक वर्षांमध्ये कंपनीची आर्थिक स्थिती मजबूत राहिल्याचे आपण बॅलन्स शिट वरून पाहू शकतो. कारण कंपनीची एकूण मालमत्ता आर्थिक वर्ष 2020 मध्ये 66.08 लाख रुपयांवरून आर्थिक वर्ष 2022 मध्ये 3.52 कोटी रुपये पर्यंत वाढली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| IPO investment of Shantidut Infra services share price after listening in stock market on 20 September 2022.

हॅशटॅग्स

IPO listing(1)share market(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x