11 December 2024 5:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

Surya Roshni Share Price | घराघरात या कंपनीचे बल्ब! सूर्या रोशनी शेअरने 6 दिवसात 19% परतावा दिला, आता स्टॉक स्प्लिटचा फायदा

Surya Roshni Share Price

Surya Roshni Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सूर्या रोशनी कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. मागील 6 ट्रेडिंग सेशनमध्ये सूर्या रोशनी कंपनीचे शेअर्स तेजीत धावत होते. अवघ्या सहा दिवसात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 19 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 31 ऑगस्ट 2023 रोजी सूर्या रोशनी कंपनीचे शेअर्स 0.19 टक्के घसरणीसह 968.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सूर्या रोशनी स्टॉक वाढीचे कारण

11 ऑगस्ट 2023 रोजी सूर्या रोशनी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कंपनीच्या संचालकांनी कंपनीचे 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स 5 तुकड्यामध्ये विभाजित करण्याचा निर्णय घेतला होता. स्टॉक स्प्लिटनंतर या कंपनीच्या शेअर्सची दर्शनी मूल्य 2 रुपये होईल. मात्र कंपनीने स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीख अद्याप जाहीर केली नाहीये.

सूर्य रोशनी तिमाही निकाल

जून 2023 तिमाहीमध्ये सूर्या रोशनी कंपनीचा EBITDA वार्षिक आधारावर 65 टक्क्यांच्या वाढीसह 116 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. तिमाही काळात सूर्या रोशनी कंपनीने मागील वर्षीच्या जून तिमाहीच्या तुलनेत 116 टक्के वाढीसह 59 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. या काळात कंपनीचा महसूल स्थिर राहिला आहे. एप्रिल ते जून 2023 या तिमाहीत सूर्य रोशनी कंपनीने 1875 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

सूर्या रोशनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे एकूण 63.96 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. आणि 35.95 टक्के भाग भांडवल किरकोळ गुंतवणूकदारांच्या ताब्यात आहे. परकीय गुंतवणूकदारांनी सूर्या रोशनी कंपनीचे 4.87 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Surya Roshni Share Price today on 31 August 2023.

हॅशटॅग्स

Surya Roshni Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x