IPO Investment | 101 वर्षे जुन्या बँकेचा IPO आज शेवटचा दिवस, ग्रे मार्केटमध्ये शेअर 25 रुपये प्रीमियमवर, शेअरच्या धमाकेदार एंट्रीची शक्यता

IPO Investment | शेअर बाजार तज्ञांच्या मते, तामिळनाडू मर्कंटाइल बँकेचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 25 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. IPO सबस्क्रिप्शनचा आज शेवटचा दिवस आहे. चला तर मग जाणून घेऊ ह्या शेअर बद्दल खास माहिती
101 वर्षे जुनी खाजगी बँक, तामिळनाड मर्कंटाइल बँकेचा IPO आता गुंतवणूक करण्यासाठी खुला करण्यात आला आहे. 7 सप्टेंबर 2022 रोजी या बँकेच्या IPO साठी गुंतवणूक करण्याचा शेवटचा दिवस आहे. तामिळनाडू मर्कंटाइल बँकेच्या IPO मध्ये सबस्क्रिप्शनच्या दुसऱ्या दिवशी 1.53 पट मधील सबस्क्राइब केले गेले आहे. बँकेच्या IPO मध्ये शेअरची प्रती शेअर किंमत 500 ते 525 रुपये दरम्यान ठरवण्यात आली आहे. तामिळनाडू मर्कंटाइल बँकेचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत.
शेअर बाजारतील तज्ञ लोकांच्या मते, तामिळनाडू मर्कंटाइल बँकेचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 25 रुपयांच्या प्रीमियम किमतीवर ट्रेडिंग करत आहेत. जर समजा बँकेचे शेअर्स 525 रुपयांच्या वरच्या किंमतीच्या बँडवर वितरीत केले गेले, आणि बुधवारी ग्रे मार्केट प्रीमियममध्ये सूचीबद्ध केले गेले तर बँकेच्या शेअर्सची स्टॉक मार्केटमध्ये एन्ट्री 550 रुपयांच्या किमतीवर होऊ शकते. बँकेचे शेअर्स 15 सप्टेंबर 2022 रोजी (BSE) बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि (NSE) नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये लिस्टिंग केले जाऊ शकतात.
तुतीकोरीन मधील खाजगी क्षेत्रातील या बँकेने माहीती दिली आहे की त्यांनी शेअर विक्रीपूर्वी आपल्या गुंतवणूकदारांकडून 363 कोटी रुपये गुंतवणूक उभारली आहे. तामिळनाडू मर्कंटाइल बँक IPO मध्ये 1.58 कोटी इक्विटी शेअर वितरीत करेल. शेअरची किंमत लिस्टिंग बँडवर IPO द्वारे तब्बल 831.6 कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न करेल. ब्रोकरेज हाऊस येस बँक सिक्युरिटीजने तामिळनाडू बँकेच्या IPO ला सबस्क्राईब “बाय” (खरेदी) रेटिंग दिले आहे. 1921 साली तामिळनाडू मर्कंटाइल बँक “नादर बँक” नावाने सुरू करण्यात आली होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| IPO investment of Tamilnadu Mercantile Bank share price on 8 September 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vedanta Share Price | 600 रुपये टार्गेट प्राईस, वेदांता शेअरमध्ये तेजीचे संकेत, सध्या 437 रुपयांवर ट्रेड करतोय - NSE: VEDL
-
Vedanta Share Price | 560 रुपये टार्गेट प्राईस, प्रभुदास लिलाधर वेदांता शेअर्सवर बुलिश, संधी सोडू नका - NSE: VEDL
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये तेजी, पण स्टॉक 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ - NSE: RELIANCE
-
IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, टार्गेट नोट करा - NSE: IREDA
-
IREDA Share Price | टॉप ब्रोकरेज फर्मने दिले संकेत, शेअर प्राईस उसळी घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
-
Suzlon Share Price | कंपनीला मिळाला नवीन कॉन्ट्रॅक्ट, सुझलॉन शेअर्स तेजीत, अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Suzlon Share Price | स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी दिले संकेत, BUY रेटिंग सह पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: SUZLON
-
NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करतोय, टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPC
-
TATA Motors Share Price | मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेजने दिले संकेत, अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
-
Vedanta Share Price | वेदांता शेअरमध्ये तेजी, कंपनीबाबत अपडेट आली, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: VEDL