 
						IPO Watch | या महिन्यात बहुतेक आयपीओ मार्फत गुंतवणूकदारांनी मजबूत कमाई केली आहे. आता नवीन वर्षात आयपीओमध्ये गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. म्हणजे 1 जानेवारी लिओ ड्राय फ्रूट्स अँड स्पाइस लिमिटेड कंपनीचा आयपीओ सब्सक्रिप्शनसाठी खुला होणार आहे. या आयपीओ’मार्फत लिओ ड्राय फ्रूट्स अँड स्पाइस कंपनी २५ कोटी १२ लाख रुपयांचा निधी उभारणार आहे.
आयपीओ शेअर प्राईस बँड
लिओ ड्राय फ्रूट्स अँड स्पाइसेस लिमिटेड कंपनीचा आयपीओ १ जानेवारी ते ३ जानेवारी २०२५ दरम्यान सब्सक्रिप्शनसाठी खुला असणार आहे. लिओ ड्राय फ्रूट्स अँड स्पाइस लिमिटेड कंपनी आयपीओ’साठी ५१ ते ५२ रुपये प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे. या आयपीओ शेअर्सचे अलॉटमेंट सोमवार, 6 जानेवारी 2025 रोजी अंतिम होण्याची शक्यता आहे. लिओ ड्राय फ्रूट्स अँड स्पाइस लिमिटेड कंपनी शेअर बीएसई एसएमईवर सूचीबद्ध करण्यात येणार आहे. शेअर सूचिबद्ध होण्याची संभाव्य तारीख बुधवार, 8 जानेवारी 2025 आहे.
एका लॉटमध्ये किती शेअर मिळतील
लिओ ड्राय फ्रूट्स अँड स्पाइसेस आयपीओच्या एका लॉट मध्ये गुंतवणूकदारांना 2000 शेअर्स मिळतील. म्हणजे गुंतवणूकदारांना कमीत कमी २००० शेअर्स आणि त्याच्या पटीत बोली लावावी लागणार आहे. म्हणजे रिटेल गुंतवणुकदारांना किमान 1,04,000 रुपये गुंतवावे लागणार आहेत. एचएनआय’साठी किमान लॉट साइज गुंतवणूक 2 लॉट असेल आणि त्यात 4,000 शेअर्स मिळतील.
लिओ ड्राय फ्रूट्स अँड स्पाइस लिमिटेड कंपनी आयपीओ’साठी श्रेनी शेअर्स लिमिटेड कंपनी बुक रनिंग लीड मॅनेजर असेल. तर बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या आयपीओची रजिस्ट्रार आहे. लिओ ड्राय फ्रूट्स अँड स्पाइस लिमिटेड कंपनी आयपीओची मार्केट मेकर रिखव सिक्युरिटीज लिमिटेड कंपनी आहे.
कंपनी बद्दल
लिओ ड्रायफ्रूट्स अँड स्पाइस ट्रेडिंग लिमिटेड कंपनीची स्थापना नोव्हेंबर 2019 मध्ये करण्यात आली होती. ही कंपनी ‘वंडू ब्रँड’ अंतर्गत विविध मसाले आणि सुका मेवा उत्पादन आणि ट्रेडिंगमध्ये कार्यरत आहे. कंपनीच्या उत्पादनांमध्ये फ्रायड अंतर्गत गोठवलेली आणि अर्धतळलेल्या उत्पादनांचा देखील समावेश आहे. कौशिक सोभागचंद शहा, पार्थ आशिष मेहता आणि केतन सोभागचंद शहा हे कंपनीचे मुख्य प्रवर्तक आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		