
IRB Infra Share Price | मागील काही दिवसांपासून स्टॉक मार्केटमध्ये अस्थिरता पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक चांगल्या कंपनीचे शेअर्स स्वस्तात खरेदीची (NSE: IRB) संधी आहे. अशीच एक मिडकॅप कंपनी म्हणजे आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, ज्याच्या शेअरने गेल्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांना ६००% परतावा दिला आहे. आयआरबी इन्फ्रा शेअरबाबत तज्ज्ञांनी महत्वाचा सल्ला दिला आहे. (आयआरबी इन्फ्रा कंपनी अंश)
तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला
आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी शेअरबाबत तज्ज्ञांनी महत्वाचा सल्ला दिला आहे. आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर शेअरमध्ये सध्या निगेटिव्ह ट्रेंड सुरु आहे. आयआरबी इन्फ्रा शेअर जेव्हा जेव्हा ५० रुपयांचा टप्पा ओलांडतो, तेव्हा प्रॉफिट बुकिंग सुरु होते. आयआरबी इन्फ्रा शेअरला ४८ रुपयांच्या पातळीवर मजबूत सपोर्ट आहे. शेअरच्या सध्याच्या पातळीवर खरेदी करणाऱ्यांनी बाहेर पडावे असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. तसेच शेअर होल्ड करणाऱ्यांनी ४८ रुपयांवर स्टॉपलॉस ठेवावा, असा देखील सल्ला दिला आहे.
शेअर्समध्ये चढ-उतार सुरूच
मंगळवार 12 ऑक्टोबर रोजी आयआरबी इन्फ्रा शेअर 1.94 टक्के घसरून 50.15 रुपयांवर पोहोचला होता. मंगळवारी दिवसभरात या शेअरने 52.19 रुपयांचा उच्चांक गाठला होता, तसेच 50 रुपयाचा निच्चांक गाठला होता. आयआरबी इन्फ्रा शेअरचा 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 78.15 रुपये होती, तर 52 आठवड्यांची निच्चांकी पातळी 34.75 रुपये होती.
एचडीएफसी सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म – ADD रेटिंग
एचडीएफसी सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने आयआरबी इन्फ्रा शेअरला ‘ADD’ रेटिंग जाहीर केली आहे. एचडीएफसी सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी शेअरसाठी 69 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. आयआरबी इन्फ्रा कंपनीच्या दुसऱ्या तिमाहीत ऑर्डरिंगवरील सुधारित दृष्टीकोन आणि संभाव्य चांगली टोल वाढ विचारात घेता एचडीएफसी सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने हा सकारात्मक अंदाज व्यक्त केला आहे.
शेअरने 600% परतावा दिला
आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी शेअर मागील पाच दिवसांत 3.91% घसरला आहे. मागील १ महिन्यात हा शेअर 14.46% घसरला आहे. गेल्या 6 महिन्यांत आयआरबी इन्फ्रा शेअर 21.58% घसरला आहे. मात्र, गेल्या १ वर्षात या शेअरने 43.49% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात आयआरबी इन्फ्रा शेअरने 600.42% परतावा दिला आहे. १५ नोव्हेंबर २०१९ रोजी आयआरबी इन्फ्रा शेअर प्राईस ७.१६ रुपये होती.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.