12 December 2024 3:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे
x

IPO GMP | आला रे आला IPO आला! ग्रे मार्केटमध्ये IPO शेअरचा धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल

IPO GMP

IPO GMP | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात IPO मध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच ओला इलेक्ट्रिक कंपनीचा आयपीओ गुंतवणूकीसाठी खुला होणार आहे. भाविश अग्रवाल सीईओ असलेल्या ओला इलेक्ट्रिक कंपनीचा IPO 2 ऑगस्ट रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. हा IPO 6 ऑगस्ट पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. ( ओला इलेक्ट्रिक कंपनी अंश )

अँकर गुंतवणूकदारांसाठी हा IPO 1 ऑगस्ट रोजी खुला केला जाईल. आणि 9 ऑगस्ट रोजी हा स्टॉक शेअर बाजारात सूचीबद्ध केला जाईल. ओला इलेक्ट्रिक कंपनी आपल्या IPO मध्ये 5500 कोटी रुपये मूल्याचे फ्रेश शेअर्स इश्यू करणार आहे. यासह कंपनीचे गुंतवणुकदार ऑफर फॉर सेल अंतर्गत 95.2 दशलक्ष शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहेत.

कंपनीचे संस्थापक भावेश अग्रवाल हे देखील आपले 47.30 दशलक्ष शेअर्स खुल्या बाजारात विकून कंपनीसाठी भांडवल उभारणी करणार आहेत. तसेच कंपनीचे प्रारंभिक गुंतवणूकदार अल्फावेव्ह, अल्पाइन, डीआयजी इन्व्हेस्टमेंट, मॅट्रिक्स आणि इतर गुंतवणुकदार 47.89 दशलक्ष शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत खुल्या बाजारात विकणार आहेत. ओला इलेक्ट्रिक कंपनीने 29 रोजी इलेक्ट्रिक वाहनांचा एक रोड शो आयोजित केला आहे.

सप्टेंबर 2023 मध्ये फंडिंगच्या शेवटच्या फेरीत ओला इलेक्ट्रिक कंपनीचे मूल्यांकन 5.4 अब्ज डॉलर्स करण्यात आले होते. IPO दरम्यान या कंपनीचे मूल्यांकन 4.24 अब्ज डॉलर्स इतके करण्यात आले आहे. 22 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीने सेबीकडे IPO संबंधित कागदपत्रे दाखल केले होते. कोटक महिंद्रा कॅपिटल, गोल्डमन सॅक्स, अॅक्सिस कॅपिटल, ICICI सिक्युरिटीज, BofA सिक्युरिटीज, Citi, Bob Caps आणि SBI Caps या संस्था ओला इलेक्ट्रिक कंपनीच्या IPO साठी इंव्हेस्टमेंट बँक म्हणून काम करत आहेत.

जून महिन्यात ओला इलेक्ट्रिक कंपनीला सेबीने आयपीओ संबंधित मंजुरी दिली होती. ओला इलेक्ट्रिक IPO 2024 मधील सर्वात मोठा न्यू टेक्नॉलॉजी IPO ठरणार आहे. ओला इलेक्ट्रिक ही कंपनी IPO लॉन्च करणारी भारतातील पहिली न्यू टेक स्टार्टअप कंपनी असेल. या कंपनीला इलेक्ट्रिक वाहन सेक्टरमध्ये TVS मोटर्स, बजाज ऑटो आणि एथर या कंपन्याकडून स्पर्धा मिळणार आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IPO GMP of Ola Electric Ltd 27 July 2024.

हॅशटॅग्स

IPO GMP(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x