
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा कंपनीचे शेअर्स किंचित घसरले आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 36,644.65 कोटी रुपये आहे. 9 ऑगस्ट 2024 रोजी कंपनीने आयोजित केलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत जून तिमाहीचे आर्थिक निकाल आणि अंतरिम लाभांश वाटप करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. ( आयआरबी इन्फ्रा कंपनी अंश )
मागील 1 वर्षात आयआरबी इन्फ्रा कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 133 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी आयआरबी इन्फ्रा स्टॉक 0.66 टक्के घसरणीसह 63.32 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
फेब्रुवारी 2009 पासून आतापर्यंत आयआरबी इन्फ्रा कंपनीने एकूण 26 वेळा लाभांश वाटप केला आहे. मागील 1 वर्षात IRB इन्फ्रा कंपनीने गुंतवणुकदारांना 0.30 रुपये लाभांश वाटप केला होता. मागील 2 आठवड्यात आयआरबी इन्फ्रा कंपनीच्या शेअर्सची किंमत 10 टक्के घसरली आहे. मागील 6 महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 13 टक्के वाढली आहे. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 133 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील 2 वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 260 टक्के आणि 5 वर्षात 597 टक्के वाढली आहे. आयआरबी इन्फ्रा कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 78.05 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 24.97 रुपये होती. तज्ञांच्या मते, पुढील काही काळात आयआरबी इन्फ्रा कंपनीचे शेअर्स 84 रुपये किमतीवर जाऊ शकतात. तज्ञांनी गुंतवणूक करताना 66 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.
सेंट्रम ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स 85 रुपये किमतीवर जाऊ शकतात. प्रभुदास लिलाधर फर्मच्या तज्ञांच्या मते, आयआरबी इन्फ्रा स्टॉक 66.50 रुपये या 50 दिवसांच्या EMA पातळीच्या वर जाण्याची शक्यता आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 84 रुपये किमतीवर जाऊ शकतो. गुंतवणूक करताना तज्ञांनी 66 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.
आयआरबी इन्फ्रा ही कंपनी महामार्ग विभागात व्यवसाय करणारी भारतातील पहिली इंटिग्रेटेड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे. आयआरबी इन्फ्रा या कंपनीकडे एकात्मिक खाजगी टोल रस्ते आणि महामार्ग पायाभूत सुविधा विकासक म्हणून 70,000 कोटी रुपयेपेक्षा जास्त मालमत्ता आहे. या कंपनीकडे संपूर्ण भारतात 17200 लेन किलोमीटरचे बांधकाम, टोलिंग, संचालन आणि देखभाल करण्याचा मजबूत ट्रॅक रेकॉर्ड आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.