 
						IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सने 2024 या वर्षात गुंतवणुकदारांना 60 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज या कंपनीचे शेअर्स किंचित वाढीसह ट्रेड करत आहेत. या कंपनीचे शेअर्स चर्चेत येण्याचे मुख्य कारण म्हणजे, सेंट्रम ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांनी या स्टॉकवर 80 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. ( आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 66.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज सोमवार दिनांक 24 जून 2024 रोजी आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 0.72 टक्के वाढीसह 66.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
7 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 78.05 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होता. तर ऑगस्ट 2023 मध्ये हा शेअर 24.97 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होता. 2024 या वर्षात आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सची किंमत 60 टक्के पेक्षा जास्त वाढली आहे. तर 2021 मध्ये या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 91 टक्के परतावा कमावून दिला होता. सेंट्रम ब्रोकिंग फर्मच्या तज्ञाच्या मते, हा स्टॉक अल्पावधीत 75 रुपये किंमत स्पर्श करू करू शकतो. त्यानंतर हा स्टॉक 80 रुपये किमतीवर जाईल.
पुढची शेअर प्राईस टार्गेट?
आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअरमध्ये पुढील सहा महिन्यांमध्ये 85 रुपये किमतीवर जाण्याची क्षमता आहे. नुकताच स्पॅनिश इन्फ्रा कंपनी फेरोव्हियलने ब्लॉक डील अंतर्गत आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे 1920 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स विकले होते. फेरोव्हियल कंपनीने आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीमध्ये सिंट्रा या उपकंपनीच्या माध्यमातून गुंतवणूक केली होती. मार्च तिमाहीत सिंट्रा कंपनीने आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे 24.86 टक्के भाग भांडवल धारण केले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		