
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 34.91 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअरमध्ये प्रचंड विक्रीचा दबाव पाहायला मिळाला.
आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारी 33.06 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज मंगळवार दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीचे शेअर्स 2.05 टक्के घसरणीसह 33.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
नुकताच IRB इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने 4428 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीने सप्टेंबर 2023 तिमाहीत 95.74 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी सप्टेंबर 2023 तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या नफ्यात 12.24 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.
मागील वर्षी याच तिमाही कालावधीत आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीने 85.30 कोटी रुपये एकत्रित निव्वळ नफा कमावला होता. जुलै-सप्टेंबर 2023 या तिमाहीत आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीने 1874 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर मागील वर्षी याच तिमाही कालावधीत कंपनीने 1438 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
IRB इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 4 लेन ललितपूर-सागर-लखनादौन NH 44 TOT प्रकल्पासाठी 4428 कोटी रुपये मूल्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. या प्रकल्पा अंतर्गत आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीला टोलिंग, ऑपरेशन, देखभाल आणि हस्तांतरणाचे काम पूर्ण करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
हा प्रकल्प NH-44 च्या 99.005 km ते 415.089 km साठी आहे. या प्रकल्पा अंतर्गत मध्य प्रदेश राज्यातील ललितपूर, ग्वाल्हेर, सागर, नरसिंगपूर आणि लखनाडोन या शहरांचा समावेश करण्यात आला आहे. या नवीन प्रकल्पामुळे आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 75000 कोटी रुपये झाला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.