 
						IREDA Share Price | मागील काही दिवसांमध्ये इरेडा लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी दिसून (NSE: IREDA) आली आहे. गेल्या ५ दिवसात इरेडा शेअर 7.50 टक्क्यांनी वाढला आहे. यापूर्वी इरेडा लिमिटेड कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर (Gift Nifty Live) परतावा दिला आहे. इरेडा शेअर पुढे अजून तेजीत येणार आहे याचे संकेत मिळत आहेत. (इरेडा लिमिटेड कंपनी अंश)
कंपनीला सरकारी धोरणांचा मोठा लाभ मिळणार
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती. त्या घसरणीचा परिणाम इरेडा लिमिटेड कंपनीच्या शेअर्सवर सुद्धा झाला होता. मात्र त्यानंतर हरयाणा आणि महाराष्ट्रातील एनडीए आघाडीच्या विजयामुळे सरकारी कंपन्यांचे शेअर्स पुन्हा तेजीत आल्याचं पाहायला मिळतंय. या तेजीचा सकारत्मक परिणाम इरेडा लिमिटेड कंपनी शेअर्सवर सुद्धा दिसू लागले आहेत. केंद्र सरकारने सुद्धा नूतनीकरणक्षम ऊर्जेकडे लक्ष केल्याने त्याचा फायदा इरेडा कंपनीला होताना दिसतोय. अशा परिस्थितीत इरेडा लिमिटेड कंपनीला सरकारी धोरणांचा मोठा लाभ मिळणार आहे.
इरेडा शेअरची स्थिती
सोमवार 02 डिसेंबर 2024 रोजी इरेडा शेअर 0.21 टक्के वाढून 205.60 रुपयांवर पोहोचला होता. इरेडा कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 310 रुपये होता, तर 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 60.55 रुपये होता. इरेडा लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 55,193 कोटी रुपये आहे.
मजबूत तिमाही आर्थिक निकाल
इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला दिलेल्या माहितीनुसार, ‘दुसऱ्या तिमाहीत इरेडा लिमिटेड कंपनीच्या निव्वळ नफ्यात 36.20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसऱ्या तिमाहीत इरेडा लिमिटेड कंपनीचा निव्वळ नफा ३६.२ हजार ३८७.७५ कोटी रुपये होता. गेल्या वर्षी सप्टेंबर तिमाहीत इरेडा लिमिटेड कंपनीला २८४.७३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.
मल्टिबॅगर 227.65% परतावा दिला आहे
मागील ५ दिवसात या शेअरने 7.50% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात या शेअरने 0.11% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात या शेअरने 7.14% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 218.51% परतावा दिल आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 96.54% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		