15 December 2024 6:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअर आला फोकसमध्ये, 343% परतावा देणारा स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News

Highlights:

  • IREDA Share PriceNSE: IREDA – इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी अंश
  • PSU शेअरची सध्याची स्थिती
  • लिस्टिंगनंतर PSU शेअरने 343% परतावा दिला
  • इरेडा आर्थिक वर्ष 2025 मध्ये 29,500 कोटी रुपये उभारणार
IREDA Share Price

IREDA Share Price | पीएसयू कंपनी IREDA म्हणजे इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड (NSE: IREDA) आपला जुलै-सप्टेंबर 2024 तिमाही आणि एप्रिल-सप्टेंबर 2024 सहामाहीचे आर्थिक निकाल 10 ऑक्टोबर २०२४ या तारखेला जाहीर करणार आहे अशी माहिती कंपनीने दिली आहे. या सरकारी कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर तिमाही निकाल अधिकृतपणे जाहीर केले जातील असं कंपनीने कळवलं आहे. विशेष म्हणजे याच बैठकीत कंपनी संचालक मंडळ अंतरिम लाभांश बाबतही निर्णय घेण्याची शक्यता आहे. (इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी अंश)

PSU शेअरची सध्याची स्थिती
मंगळवार दिनांक 08 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 6.28 टक्के वाढून 224 रुपयांवर बंद झाला. आजच्या तारखेपर्यंत कंपनीचे एकूण मार्केट कॅप 60,334 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. आजच्या तारखेपर्यंत IREDA कंपनीत प्रवर्तकांचा हिस्सा 75% टक्के होता हे अधिकृत आकडेवारीतून स्पष्ट होतंय. बुधवार दिनांक 09 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 3.61 टक्के वाढून 232.50 रुपयांवर ट्रेड करत आहे.

लिस्टिंगनंतर PSU शेअरने 343% परतावा दिला
इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीचा शेअर स्टॉक मार्केट मध्ये 29 नोव्हेंबर 2023 रोजी लिस्टेड झाला होता. लिस्टिंगच्या दिवशी हा PSU शेअर बीएसईवर 50 रुपयांवर लिस्ट झाला होता. तर स्टॉक लिस्टिंगच्या दिवशी ५९.९९ रुपयांवर बंद झाला होता. लिस्टिंगच्या दिवसापासून शेअरने 343% परतावा दिला आहे. विशेष म्हणजे या PSU कंपनीचा IPO 38.80 पट सब्सक्राइब झाला होता.

इरेडा आर्थिक वर्ष 2025 मध्ये 29,500 कोटी रुपये उभारणार
या वर्षी सप्टेंबरमध्ये PSU कंपनीच्या व्यवस्थापनाने सांगितले आहे की, आर्थिक वर्ष 2025 मध्ये कंपनीने डेट मार्केटमधून एकूण 25,000 कोटी रुपये आणि इक्विटीद्वारे सुमारे 4,500 कोटी रुपये उभे करण्याची मोठी योजना आखली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IREDA Share Price 09 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(126)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x