
IREDA Share Price | सोमवार, 13 जानेवारी 2025 रोजी पुन्हा शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. मार्केट सेन्सेक्स ८०० अंकांनी घसरून ट्रेड करत होता. तर निफ्टी मध्ये देखील जवळपास २२५ अंकांची घसरण पाहायला मिळाली होती. दरम्यान, या घसरणीतही आयसीआयसीआय डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी शेअरबाबत सकारात्मक तेजीचे संकेत दिले आहेत. ब्रोकरेजने इरेडा शेअरची टार्गेट प्राईस देखील जाहीर केली आहे.
इरेडा कंपनी शेअरची सध्याची स्थिती
सोमवार, 13 जानेवारी 2025 रोजी इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी शेअर 4.28 टक्क्यांनी वाढून 209.76 रुपयांवर पोहोचला होता. इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 310 रुपये होता, तर सुझलॉन एनर्जी शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 103 रुपये होता. इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 56,362 कोटी रुपये आहे.
आयसीआयसीआय डायरेक्ट ब्रोकरेज फर्म – इरेडा शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग
आयसीआयसीआय डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने इरेडा कंपनी शेअरसाठी बाय रेटिंग जाहीर केली आहे. ब्रोकरेज फर्मने इरेडा कंपनी शेअरसाठी 250 रुपये टार्गेट प्राइस दिली आहे. म्हणजे गुंतवणूकदारांना शेअरच्या सध्याच्या पातळीपासून 24% परतावा मिळू शकतो.
आयसीआयसीआय डायरेक्टने पुढे म्हटले आहे की, ‘इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीने डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. त्यानुसार वार्षिक आधारावर एयूएम मध्ये 36.7 टक्क्यांची वाढ होऊन तो 68,960 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. डिसेंबर तिमाहीत एनआयआय’मध्ये देखील ३८.९ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर एकूण मार्जिन ३.३३ टक्के होते. लॉन्ग टर्मच्या दृष्टिकोनातून या क्षेत्रात मजबूत संधी आहे. तसेच तिमाही निकालातील एयूएम वाढीमुळे मूल्यांकनाला वेग येण्याची अपेक्षा आहे असं आयसीआयसीआय डायरेक्टने म्हटलं आहे.
इरेडा कंपनीचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल
पीएसयू इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले आहेत. चालू आर्थिक वर्ष 2024-25 च्या तिसऱ्या तिमाहीत इरेडा कंपनीचा निव्वळ नफा 27 टक्क्यांनी वाढून 425.37 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तिसऱ्या तिमाहीत इरेडा कंपनीच्या ऑपरेटिंग उत्पन्नात ३५.५७ टक्क्यांची वाढ होऊन ते १,६९८.९९ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.