16 May 2025 9:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मजबूत कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER IRFC Share Price | 30 टक्के अपसाईड परतावा मिळेल, मल्टिबॅगर पीएसयू शेअर्सबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Mazagon Dock Share Price | रॅलीगीअर ब्रोकिंग फर्म बुलिश, लेटेस्ट टार्गेट प्राईस अलर्ट, मोठ्या कमाईची संधी - NSE: MAZDOCK HAL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल बुलिश, BUY रेटिंग - NSE: HAL Vedanta Share Price | जबरदस्त अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर, BUY रेटिंग, मल्टिबॅगर परतावा देणारा शेअर - NSE: VEDL Patel Engineering Share Price | 42 रुपयांचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: PATELENG Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: JIOFIN
x

IREDA Share Price | 32 रुपयाच्या शेअरने अल्पावधीत दिला 500% परतावा, आता पुढची टार्गेट प्राईस जाहीर

IREDA Share Price

IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. या कंपनीचा IPO 2 महिन्यांपूर्वी 32 रुपये किमतीवर लाँच करण्यात आला होता. आता मात्र या कंपनीच्या शेअर्सची किंमत 195 रुपयेच्या पार गेली आहे.

आयआरईडीए कंपनीचे शेअर्स आपल्या IPO इश्यू किंमतीच्या तुलनेत 500 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. तज्ञांच्या मते या सरकारी कंपनीचे शेअर्स आणखी तेजीत वाढतील. शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 195.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

तज्ज्ञांच्या मते, आयआरईडीए कंपनीचे शेअर्स पुढील काही महिन्यांत 240 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. या कंपनीचे शेअर्स 32 रुपये किमतीवरून वाढून 195 रुपये किमतीवर पोहचले आहे. आयआरईडीए कंपनीने आपल्या आयपीओमध्ये शेअर्सची किंमत बँड 30 ते 32 रुपये निश्चित केली होती. या कंपनीचा IPO 21 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीचे शेअर्स 29 नोव्हेंबर रोजी 50 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. या कंपनीचे शेअर्स आता बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज या दोन्ही प्लॅटफॉर्मवर ट्रेड करत आहेत.

GCL ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांनी म्हंटले आहे की, श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सूर्योदय योजना जाहीर केली होती. या योजनेंतर्गत देशातील 1 कोटी घरांवर रुफटॉप सोलर पॅनेल बसवण्याची घोषणा करण्यात आली आहे. या प्रकल्पाचा फायदा आयआरईडीए सारख्या कंपन्यांना देखील होणार आहे. म्हणून तज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे की, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 240 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.

तज्ञांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना 139 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीचा IPO जवळपास 38.80 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. त्यात किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 7.73 पट अधिक सबस्क्राइब झाला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IREDA Share Price NSE Live 03 February 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या