24 October 2024 10:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | कंपनी ऑर्डरबुक मजबूत होऊनही शेअर घसरतोय, पुढे रॉकेट तेजी, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: NBCC NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत मोठी अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BHEL NHPC Share Price | NHPC शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर 'ओव्हरसोल्ड' झोनमध्ये, स्टॉक बाऊन्स बॅक करणार, कमाईची संधी - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, स्टॉक चार्टवर महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

IREDA Share Price | तज्ज्ञांचा IREDA शेअर खरेदीचा सल्ला, स्टॉक प्राईस सपोर्टसह टार्गेट प्राईस जाहीर

IREDA Share Price

IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारी 3.30 टक्क्यांच्या वाढीसह 178.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे.

आयआरईडीए कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 214.80 रुपये होती. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 197.33 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 7 जून 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 0.73 टक्के घसरणीसह 177 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शेअर बाजारातील तज्ञाच्या मते, आयआरईडीए स्टॉकने 160 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. तर आयआरईडीए स्टॉकला 190 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार मिळत आहे. जर हा स्टॉक 190 रुपये किमतीच्या पार गेला तर अल्पवधित शेअर 230-240 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांच्या मते, या स्टॉकची पुढील एका महिन्याची ट्रेडिंग रेंज 160-190 रुपये दरम्यान असेल.

मार्च 2024 तिमाहीत आयआरईडीए कंपनीचा नफा वार्षिक आधारावर 253.6 कोटी रुपयेवरून वाढून 337.4 कोटी रुपयेवर गेला आहे. आयआरईडीए कंपनीच्या नफ्यात मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 33 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. कंपनीचे निव्वळ व्याज उत्पन्न मार्च 2024 तिमाहीत 481.4 कोटी रुपये नोंदवले गेले आहे.

मागील वर्षी याच तिमाहीत आयआरईडीए कंपनीचे निव्वळ व्याज उत्पन्न 356.4 कोटी रुपये नोंदवले गेले होते. आयआरईडीए कंपनीची क्रेडिट गुणवत्ता सुधारली आहे, कारण कंपनीचा GNPA 3.21 टक्क्यांवरून कमी होऊन 2.36 टक्क्यांवर आला आहे. यासह कंपनीचा NNPA 1.66 टक्क्यांवरून कमी होऊन 0.99 टक्क्यांवर आला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IREDA Share Price NSE Live 07 June 2024.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(111)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x