25 January 2025 6:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरबाबत महत्वाचे संकेत, जेफरीज ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Bonus Share News | फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी 23 रुपयाच्या मल्टिबॅगर शेअरवर फ्री बोनस शेअर्स देणार, फायदा घ्या - NSE: SBC SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना सेव्ह करा, महिना SIP वर मिळेल 1.35 कोटी रुपये परतावा EPFO New Rule | खाजगी कर्मचाऱ्यांनो, EPFO ने नियम बदलले, कागदपत्रांशिवाय प्रोफाइल अपडेट करा, अन्यथा घामाचा पैसा गमवाल New Auto Taxi Fare | अच्छे दिन आ गए, बस, रिक्षा आणि टॅक्सी भाड्यात मोठी वाढ, इतके पैसे मोजावे लागणार Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात दुपटीने वाढ, शेअर प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, प्राईस बँड सह डिटेल्स जाणून घ्या
x

IREDA Share Price | PSU शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, BUY रेटिंगसह पुढची मोठी टार्गेट प्राईस जाहीर

IREDA Share Price

IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअर्सने मागील एका महिन्यात 2.81 टक्के घसरण नोंदवली आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 61.10 टक्के परतावा कमावून दिला आहे. मंगळवार दिनांक 18 जून रोजी आयआरईडीए स्टॉक 180.20 रुपये किमतीवर ओपन झाला होता. तर दिवसाअखेर हा स्टॉक 179.10 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( आयआरईडीए कंपनी अंश )

आयआरईडीए या PSU स्टॉकने IPO नंतर गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट वाढवले आहेत. आज बुधवार दिनांक 19 जून 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 0.78 टक्के घसरणीसह 176.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

आयआरईडीए कंपनीने सोमवार दिनांक 24 जून रोजी आपली 37 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. ब्रोकरेज फर्म चॉइस इक्विटी ब्रोकिंगने आपल्या अहवालात IREDA स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते, आयआरईडीए स्टॉक पुढील काळात 203 रुपये किमतीवर जाऊ शकतो. या स्टॉकने 170 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे.

आयआरईडीए कंपनीचा IPO नोव्हेंबर 2023 मध्ये लाँच करण्यात आला होता. या कंपनीच्या IPO चा आकार 2,150.21 कोटी रुपये होता. या कंपनीच्या IPO मध्ये फ्रेश इश्यू आणि ऑफर फॉर सेल अंतर्गत शेअर्स जारी करण्यात आले होते. आयआरईडीए कंपनीचा IPO 21 नोव्हेंबर 2023 ते 23 नोव्हेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता.

29 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध झाले होते. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची किंमत बँड 30 ते 32 रुपये प्रति शेअर निश्चित केली होती. आयआरईडीए कंपनीचे बाजार भांडवल 48,003 कोटी रुपये आहे. आयआरईडीए कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 215 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 49.99 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IREDA Share Price NSE Live 19 June 2024.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x