14 December 2024 7:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

PPF investment | पब्लिक प्रॉव्हिडंट फंडात गुंतवणूक करण्याचे 5 जबरदस्त फायदे, जाणून घ्या PPF गुंतवणुकीबाबत

PPF investment

PPF investment | भारत सरकारद्वारे देशातील नागरिकांसाठी पीपीएफ ही एक अल्पबचत योजना संचालित केली जाते. दर तीन महिन्यानंतर सरकार PPF वरील व्याजदर घोषीत करत असते. चांगला परतावा आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून ही योजना योग्य पर्याय आहे. तुम्ही दीर्घकालावधीसाठी पीपीएफमध्ये गुंतवणूक करून मोठी रक्कम जमा करू शकता. शिवाय पीपीएफमध्ये गुंतवणूक करून निवृत्तीनंतरच्या आयुष्याचे देखील नियोजन करता येते.

लोकप्रिय गुंतवणूक योजना :
देशातील सर्वात लोकप्रिय गुंतवणूक योजना म्हणून पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजे पीपीएफ ही योजना ओळखली जाते. PPF ही एक अल्पबचत योजना असून केंद्र सरकारद्वारे तिचे संचालन केले जाते. दर तिमाहीला सरकार याचे व्याजदर टक्केवारी घोषीत करते. चांगला परतावा आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून ही योजना सर्वच स्तरांतील नागरिकांसाठी योग्य पर्याय आहे. दीर्घकालावधीत पीपीएफमध्ये गुंतवणूक करून मोठी रक्कम जमा करता येते. शिवाय पीपीएफमध्ये गुंतवणूक करून निवृत्तीनंतरच्या आयुष्याचेदेखील नियोजन करता येते. पीपीएफचा गुंतवणूक कालावधी १५ वर्षांचा असतो. त्यानंतर गुंतवणुकदार कालावधीत आणखी पाच वर्ष वाढ करू शकतो.

PPF चे लाभ :
PPF मध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक लाभ आहेत जसे की चांगला व्याजदर, सुरक्षितता आणि कर बचत यांचा लाभ मिळतो. यामध्ये खाते सुरू केल्यानंतर तुम्ही कर्ज घेण्यास पात्र असाल तसेच अंशत: पैसे काढण्याचीदेखील सुविधा तुम्हाला मिळते. पीपीएफसारख्या योजनेत गुंतवणूक केल्यावर नेमके कोणकोणते फायदे मिळतात ते पाहूया.

आकर्षक व्याजदर :
भारत सरकारद्वारे पीपीएफसाठीच्या व्याजदरात दर तीन महिन्यानी बदल केले जाते. सध्या पीपीएफवर 7.1% टक्के व्याजदर दिला जातो. यात वार्षिक आधारावर चक्रवाढीचा फायदा मिळतो. अनेक बॅंकांमधील मुदतठेवींवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा पीपीएफवर गुंतवणुकदारांना जास्त व्याज मिळते.

गुंतवणूक कालावधी वाढवण्याचा पर्याय :
पीपीएफमधील गुंतवणुकीचा कालावधी कमाल 15 वर्षे असतो. या कालावधीत योजना धारकाला करबचतीचा फायदा आणि करात सुट मिळते. यानंतर आपण गरजेच्या वेळी करवजावटीच्या कक्षेत येणारी रक्कम काढू शकता. आणखी एक फायदा असा की खातेधारक 15 वर्ष कालावधी पूर्ण झाल्यावर देखील पुढील 5 वर्षांसाठी ही गुंतवणूक वाढवण्यासाठी अर्ज करू शकतात. कालावधी पूर्ण झाल्यावर गुंतवणुकदार हे ठरवू शकतात की गुंतवणूक सुरू ठेवायची की नाही.

पीपीएफ योजनेत कर बचतीचा फायदा :
PPF वर इन्कम टॅक्स अॅक्ट 1961 मध्ये सेक्शन 80 सी अंतर्गत कर वजावटीचा लाभ आपण घेऊ शकता. या योजनेत करण्यात आलेल्या गुंतवणुकीवर 1.5 लाख रुपयांपर्यत कर वजावटीचा किंवा कर बचतीचा फायदा घेता येतो. पीपीएफ टॅक्सेशनच्या EEE मॉडेलचे अनुसरण करते. याचा अर्थ असा आहे की यातील गुंतवणुकीवर कमावण्यात आलेल्या व्याज आणि मॅच्युरिटीच्या रकमेवर दोघांवरही करबचतीचा लाभ मिळतो.

सुरक्षित गुंतवणूक : 
पीपीएफ ही योजना सरकारकडून चालवण्यात येणारी अल्पबचत योजना आहे ज्यात गुंतवणुकदारांचे भांडवल सुरक्षित असते आणि त्यावर चांगला परतावा दिला जातो. ज्यांना जोखीम नको आहे आणि चांगला परतावा हवा असेल तर असे लोक यात गुंतवणूक करू शकतात. यामध्ये करण्यात आलेल्या गुंतवणुकीवर व्याजाची गॅरंटी मिळते. शिवाय सर्व रक्कम सुरक्षित असते आणि पूर्ण रकमेवर संरक्षण मिळते. त्याउलट बॅंकेतील मुदतठेवीवर फक्त ५ लाख रुपयांपर्यतच डीआयसीजीसीद्वारे विमा संरक्षण मिळते.

पीपीएफवर कर्ज घेता येते :
पीपीएफ खातेधारकाना आपल्या खात्यावर कर्ज घेण्याची देखील सुट असते. कर्ज मिळण्यासाठी पीपीएफ खाते सुरू केल्यापासून तिसऱ्या वर्षापासून ते सहाव्या वर्षापर्यत आपण कर्ज घेण्यास पात्र असू शकता. ज्या लोकांना कोणतेही तारण न ठेवता छोट्या कालावधीसाठी कर्ज हवे आहे त्यांच्यासाठी ह्या योजनेच्या माध्यमातून त्यांना खूप फायदा होऊ शकतो. कर्जाची रक्कम ज्या वर्षी कर्जासाठी अर्ज केला आहे त्यानंतरच्या दुसऱ्या आर्थिक वर्षाच्या शेवटी असलेल्या बॅलन्सच्या २५ टक्क्यांपर्यत असू शकते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

 News Title: PPF investment funds benefits over investment check details on 20 July 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x