27 November 2022 5:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
OnePlus 11 5G Smartphone | लाँचिंगपूर्वी वनप्लस 11 स्मार्टफोनची माहिती लीक, फीचर्स आणि किंमत पहा Google Messages | गुगल शॉर्ट्सने इन्स्ट्राग्रामचा बँड वाजवल्यानंतर व्हॉट्सॲपचा बँड वाजवणार गुगल मेसेजेस? Bhediya Day Box Office | भेडिया सिनेमाची धमाकेदार कमाई, प्रेक्षकांच्या प्रतिसादाने कलेक्शन जोमात Business Idea | 1 लाख मासिक उत्पन्नासाठी सुरू करा हा व्यवसाय, सरकारकडून 35 टक्के अनुदान देईल, प्रोजेक्ट डिटेल्स Airtel Jio 5G | देशातील कोणत्या शहरांमध्ये उपलब्ध आहे 5G सेवा, पाहा संपूर्ण यादी, तुमचं शहर आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर शिंदेचं दुर्लक्ष, पण कंटेनर भरून खोके दिले अशा वायफळ प्रतिक्रियांसाठी प्रचंड वेळ? Drishyam 2 Box Office | अजय देवगनच्या सिनेमाने मोडले अनेक रेकॉर्ड्स, शनिवारी मोठी कमाई, किती कलेक्शन?
x

Post Office Schemes | पोस्ट ऑफिसच्या अल्पबचत योजनांचे व्याजदर वाढले, नवीन व्याजदर तपासा आणि गुंतवणूक करा

Post Office Schemes

Post Office Schemes | तुम्ही जर पोस्ट ऑफिस अल्प बचत योजनेत गुंतवणूक करण्यास इच्छुक असाल किंवा तुम्ही गुंतवणुकीसाठी नवीन योजना शोधत असाल तर तुमच्या साठी एक आनंदाची बातमी आहे. भारत सरकारने 10 तिमाहीच्या प्रतीक्षेनंतर पोस्ट ऑफिसच्या अल्पबचत योजनांचे व्याजदर वाढवले आहेत. केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीसाठी म्हणजेच ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीसाठी अल्पबचत योजनामधील गुंतवणुकीवर व्याजदर वाढवले आहे.

नवीन व्याजदराची अमलबजावणी :
1 ऑक्टोबर 2022 पासून पोस्ट खात्यातील अल्प बचत योजनेतील गुंतवणुकीवर नवीन व्याजदर लागू केले जातील. भारत सरकारने 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या तिमाहीसाठी पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र, ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि दोन ते तीन वर्षांच्या मुदत ठेवींसह पाच इतर अल्प बचत योजनांच्या गुंतवणुकीचे देय व्याजदर वाढवले आहेत. ही व्याज दरातील वाढ जवळपास 0.1 टक्के ते 0.3 टक्क्यांपर्यंत राहील. मात्र, PPF सह काही इतर योजनांचे व्याजदर तसेच राहतील, त्यात कोणतीही वाढ केलेली नाही.

पूर्वीचे व्याजदर आणि नवीन व्याजदर :
पोस्ट ऑफिसच्या तीन वर्षांच्या मुदत ठेवी किंवा टाइम डिपॉझिट योजनेवर पूर्वी 5.5 टक्के व्याज दिला जात होता, आता नवीन व्याजदराने 5.8 टक्के व्याज परतावा दिला जाईल. म्हणजेच, आता वरील योजनेवर 30 बेसिस पॉइंट्सने/0.30 टक्के व्याज अधिक दिला जाईल. पोस्ट ऑफिसच्या दोन वर्षांच्या Time Deposit योजनेवर आता 5.5 टक्क्यांऐवजी 5.7 टक्के व्याज परतावा दिला जाईल. भारतीय वित्त मंत्रालयाने एक अधिसूचना जारी करून असे म्हटले आहे की, ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचा व्याजदर ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीसाठी 7.4 टक्क्यांवरून 7.6 टक्के वाढवण्यात आला आहे. म्हणजेच या योजनेच्या नवीन व्याजदरात 20 बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आली आहे.

इंडिया पोस्टच्या किसान विकास पत्र आणि किसान क्रेडिट कार्ड या योजनेच्या बाबतीत भारत सरकारने मॅच्युरिटी कालावधी आणि व्याजदर दोन्हीमध्ये बदल केले आहेत. किसान विकास पत्राचा व्याजदर 6.9 टक्क्यांवरून वाढवून 7 टक्के करण्यात आला आहे,म्हणजेच त्यात 0.10 टक्के वाढ करण्यात आली आहे. पूर्वी या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 124 होता, तो आता कमी करून 123 महिन्यांचा करण्यात आला आहे.

मासिक उत्पन्न योजनेत 6.6 टक्क्यांऐवजी आता 6.7 टक्के व्याज दिला जाईल. लक्षात ठेवा की PPF वर सध्या 7.1 टक्के व्याज दिला जातो आणि सुकन्या समृद्धी खाते योजनेवर 7.6 टक्के व्याज परतावा मिळतो. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावर 6.8 टक्के व्याज परतावा आणि 5 वर्षांच्या RD योजनेत 5.8 टक्के व्याज दिला जातो. 5 वर्षांच्या TD योजनेवर 6.7 टक्के त्याच वेळी बचत ठेवी आणि एक वर्षाच्या मुदत ठेवींवर 4 टक्के आणि 5.5 टक्के व्याज दिला जातो. वरील योजनेचे व्याजदर आहे तसेच राहतील, त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

RBI ने दर वाढवल्याचा परिणाम :
RBI ने मे 2022 पासून बेंचमार्क रेपो व्याजदरात140 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. त्यामुळे बँकांनी FD आणि इतर ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. याचा परिणाम म्हणून भारत सरकार अल्पबचत योजनांवरील व्याजदरही सुधारू शकते, असा अंदाज तज्ञांनी वर्तवला होता. वित्त मंत्रालयाच्या एका परिपत्रकानुसार, केंद्र सरकार मागील तीन महिन्यांच्या सरकारी सिक्युरिटीजच्या उत्पन्नाच्या आधारावर प्रत्येक तिमाहीत अल्पबचत योजनांच्या व्याजदराचे पुनरावलोकन करेल, आणि शक्य असल्यास त्यात वाढ करेल. सरकारने 10 तिमाहीपूर्वी गुंतवणूक योजनावरील व्याजदर दर कमी केले होते.आता त्यात सुधारणा करण्यात येत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Post Office Scheme interest rates has been increased by Government of India on 30 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x