
IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट लिमिटेड कंपनीचे शेअर्स मागील 2 दिवसापासून विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. सध्या जवळपास सर्वच दिग्गज स्टॉकमध्ये नफा वसुली पाहायला मिळत आहे. या कंपनीने 2030 पर्यंत महारत्न दर्जा प्राप्त करण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. मागील महिन्यात आयआरईडीए कंपनीला नवरत्न दर्जा बहाल करण्यात आला आहे. त्यानंतरच्या व्यवहारात हा स्टॉक 5 टक्क्यांनी वाढला होता. ( इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट लिमिटेड कंपनी अंश )
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 1.7 टक्के घसरणीसह ट्रेड करत होते. दिवसा अखेर हा स्टॉक 193 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज मंगळवार दिनांक 28 मे 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 3.31 टक्के घसरणीसह 186.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील 5 दिवसात आयआरईडीए स्टॉक 7 टक्क्यांनी वाढला आहे. अवघ्या सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे तिप्पट वाढवले आहेत.
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 220 टक्के परतावा कमावून दिला आहे. महारत्न दर्जा प्राप्त करण्यासाठी आयआरईडीए कंपनीने काही उद्दिष्टे निश्चित केली आहेत. 2030 पर्यंत कंपनीने आपले वार्षिक कर्ज वितरण 5 पटीने वाढवून 1.36 लाख कोटी रुपये करण्याची योजना आखली आहे. आर्थिक वर्ष 2023-2024 च्या अखेरीस IREDA कंपनीचे कर्ज वितरण 25,089 कोटी रुपये होते. जे 2023 च्या तुलनेत 15 टक्के वाढले आहे.
IREDA कंपनीने 2030 पर्यंत 3.5 लाख कोटींचे कर्ज बुक तयार करण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. हे प्रमाण आर्थिक वर्ष 2023-2024 मधील 59,650 कोटी रुपये कर्ज बुकच्या तुलनेत 6 पट अधिक आहे. महारत्न दर्जा प्राप्त करण्यासाठी कंपनीची मागील तीन वर्षाची सरासरी वार्षिक उलाढाल 25,000 कोटींपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
महारत्न दर्जा मिळाल्यावर सरकारी कंपन्यांना अनेक सवलती मिळतात. या कंपन्या आपल्या एकूण मालमत्तेपैकी 15 टक्के निधी सरकारच्या पूर्वपरवानगीशिवाय एखाद्या प्रकल्पात गुंतवू शकतात. आयआरईडीए कंपनीचे 147.8 कोटी शेअर्स 30 मे रोजी लॉक इन कालावधी संपल्यानंतर ट्रेडिंगसाठी पात्र म्हणून गणले जातील. हे शेअर्स कंपनीच्या एकूण इक्विटीच्या 55 टक्के आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.