13 December 2024 12:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Suzlon Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकवर 'बाय' रेटिंग, मिळेल मजबूत परतावा, यापूर्वी 1 वर्षात 351% परतावा दिला

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांचे पैसे अक्षरशः दुप्पट झाले आहेत. नुकताच या कंपनीने आपले मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )

अनेक ब्रोकरेज हाऊसने सुझलॉन एनर्जी स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग कायम ठेवली आहे. ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने आपल्या अहवालात सुझलॉन एनर्जी स्टॉकबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. आज मंगळवार दिनांक 28 मे 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 1.77 टक्के घसरणीसह 44.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

ब्रोकरेज फर्मच्या मते, सुझलॉन एनर्जी स्टॉक पुढील काळात 10 टक्के वाढू शकतो. जेएम फायनान्शिअल फर्मने सुझलॉन एनर्जी स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या महसुलात वार्षिक आधारावर 30 टक्क्यांची वाढ झाली होती. वार्षिक आधारावर कंपनीचा EBITDA 53 टक्क्यांनी वाढला आहे. कंपनीचे मजबूत तिमाही निकाल पाहता ICICI सिक्युरिटीज फर्मने सुझलॉन एनर्जी स्टॉकवर 54 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे.

जेएम फायनान्शियल सर्व्हिसेस फर्मने सुझलॉन एनर्जी स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन 54 रुपये टार्गेट प्राइससाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1 टक्क्यांच्या घसरणीसह 45 रुपये किमतीवर आले होते. मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 351 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 11 टक्के वाढले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 28 May 2024.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(270)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x