
IRFC Share Price | मंगळवारी स्टॉक मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळाली. स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये 1 टक्क्यांहून अधिक तेजी (NSE: IRFC) दिसून आली. विशेष म्हणजे रेल्वे संबंधित शेअर्स तेजीत आहेत. या तेजीचा फायदा इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी शेअरला सुद्धा झाला आहे. मंगळवार 19 ऑक्टोबर रोजी हा शेअर 5.48 टक्के वाढून 145.87 रुपयांवर पोहोचला होता. (आयआरएफसी कंपनी अंश)
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने ८ वर्षांनंतर सरकारी कंपन्यांच्या भांडवल पुनर्रचनेच्या निकषांमध्ये मोठा बदल केला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर आयआरएफसी, आरव्हीएनएल आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्सनी अप्पर सर्किट हिट केला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह आहे.
आयआरएफसी शेअर तेजीत
इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी शेअर मंगळवारी 5.31 टक्क्यांनी वधारून 145.63 रुपयांवर पोहोचला. आयआरएफसी शेअरमध्ये तेजीचे कारण म्हणजे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने ८ वर्षांनंतर शेअर बायबॅक, डिव्हिडंड पेमेंट, बोनस इश्यू तसेच पीएसयू कंपन्यांच्या स्टॉक स्प्लिटशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. आयआरएफसी लिमिटेड कंपनी शेअर्स २९ नोव्हेंबरपासून फ्युचर्स अँड ऑप्शन्स (F&O) स्पेसमध्येही ट्रेडिंग सुरू करतील.
काय आहेत नवे नियम?
केंद्र सरकारने जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार PSU कंपन्यांकडे विस्तारासाठी अधिक रोकड उपलब्ध होईल. त्याचबरोबर या PSU कंपन्यांना करोत्तर नफ्याच्या किमान ३०% किंवा एकूण निव्वळ संपत्तीच्या ४% रक्कम लाभांश म्हणून भागधारकांना द्यावी लागणार आहे. या नियमाचा थेट फायदा गुंतवणूकदारांना होणार आहे.
शेअरने 487% परतावा दिला
मागील १ महिन्यात या शेअरने 0.65% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात शेअर 18.85% घसरला आहे. मागील १ वर्षात शेअरने 91.37% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात शेअरने 487.22% परतावा दिला आहे. YTD आधारावर शेअरने 45.05% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.