
IRFC Share Price | आयआरएफसी म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरमध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. आयआरएफसी (NSE: IRFC) कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 5.76 टक्के घसरली होती. मागील एका महिन्यात आयआरएफसी स्टॉक 7.74 टक्के कमजोर झाला होता. (इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी अंश)
स्टॉक प्राईस उच्चांकी किंमतीवरून 31% घसरली
आज शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी आयआरएफसी कंपनीचे शेअर्स 0.67 टक्के वाढीसह 157.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील काही दिवसांपासून रेल्वे कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. आयआरएफसी कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किंमत पातळीवरून 31 टक्के घसरले आहेत. मागील महिन्यात आयआरएफसी स्टॉक 13 टक्केपेक्षा जास्त घसरला होता. 2024 या वर्षात आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 59 टक्के परतावा कमावून दिला आहे.
शेअरने 3 वर्षात दिला 613% परतावा
मागील एक, दोन आणि तीन वर्षांमध्ये आयआरएफसी कंपनीचे शेअर्स अनुक्रमे 112.6 टक्के, 649.8 टक्के आणि 613 टक्के वाढले आहेत. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2.05 लाख कोटी रुपये आहे. आयआरएफसी स्टॉक सध्या 150 रुपये या आपल्या 200 दिवसांच्या एक्सपोनेन्शिअल मूव्हिंग एव्हरेज किमतीच्या वर ट्रेड करत आहे. जर हा स्टॉक 180 रुपये किंमत पातळी ओलांडण्यात अयशस्वी झाला, तर शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव पाहायला मिळू शकतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.