
IRFC Share Price | शुक्रवार, 24 जानेवारी 2025 रोजी आयआरएफसी लिमिटेड कंपनी शेअर 0.88 टक्क्यांनी घसरून 140.12 रुपयांवर पोहोचला होता. आयआरएफसी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 1,82,959 कोटी रुपये आहे. आयआरएफसी कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 229 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 116.65 रुपये होती.
आयआरएफसी लिमिटेड शेअरची ट्रेडिंग रेंज
29 जानेवारी 2021 रोजी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी शेअर 24.80 रुपयांवर ट्रेड करत होता. सध्या आयआरएफसी लिमिटेड कंपनी शेअर 140.12 रुपयांवर पोहोचला आहे. शेअरची गुरुवारची बंद किंमत 141.37 रुपये होती. शुक्रवारी दिवसभरात हा शेअर 139 रुपये ते 143.18 रुपये या रेंजमध्ये ट्रेड करत होता.
आयआरएफसी शेअरबाबत तज्ज्ञांचा सल्ला
लवकरच केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी चांगले शेअर्स निवडले पाहिजेत. दरम्यान, ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीवर मार्केट विश्लेषकांनी रेल्वे क्षेत्रासंबंधित शेअर्सबाबत तेजीचे संकेत दिले आहेत. यामध्ये आयआरएफसी शेअर्सचा सुद्धा समावेश आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी या शेअरची टार्गेट प्राईस आणि स्टॉप लॉस देखील जाहीर केला आहे.
स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी आयआरएफसी शेअरची सपोर्ट लेव्हल मजबूत असल्याचे म्हटले आहे. टेक्निकल चार्टनुसार आयआरएफसी शेअरला 128 ते 130 रुपयाच्या पातळीवर सपोर्ट आहे. गुंतवणूकदारांनी या सपोर्ट पातळीवर स्टॉप लॉस ठेवावा. आयआरएफसी शेअरने १६० रुपयांची पातळी ओलांडल्यावर शेअरमध्ये एव्हरेज करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. आयआरएफसी शेअरने 160 रुपयांची पातळी ओलांडल्यावर शेअरमध्ये वाढ होऊन तो 200 रुपयांच्या पातळीवर पोहोचू शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
आयआरएफसी कंपनी शेअरने किती परतावा दिला
मागील ५ दिवसात आयआरएफसी कंपनी शेअर 4.82% घसरला आहे. मागील १ महिन्यात आयआरएफसी कंपनी शेअर 4.92% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 26.93% घसरला आहे. मागील १ वर्षात आयआरएफसी कंपनी शेअर 18.27 टक्के घसरला आहे. गेल्या ५ वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना 466.65 टक्के परतावा दिला आहे. मात्र YTD आधारावर आयआरएफसी शेअर 6.51% घसरला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.