12 December 2024 12:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON
x

Bigbloc Share Price | संधी सोडू नका! फ्री बोनस शेअर्स मिळतील, शॉर्ट टर्म मध्ये वाढेल पैसा

Bigbloc Share Price

Bigbloc Share Price | बिगब्लॉक कन्स्ट्रक्शन या एरेटेड ऑटोक्लेव्हड कॉक्रिट ब्लॉक्स बनवणाऱ्या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळाली आहे. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स अफाट तेजीत धावत होते. दिवसभराच्या व्यवहारात हा स्टॉक 261.40 रुपये किमतीवर पोहचला होता. ( बिगब्लॉक कन्स्ट्रक्शन कंपनी अंश )

सध्या बिगब्लॉक कन्स्ट्रक्शन कंपनी चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. शुक्रवार दिनांक 5 जुलै 2024 रोजी बिगब्लॉक कन्स्ट्रक्शन स्टॉक 7.11 टक्के वाढीसह 255.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार शंकर शर्मा यांनी देखील बिगब्लॉक कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. कंपनीने शुक्रवार दिनांक 19 जुलै रोजी संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक बोनस शेअर्स वाटप करण्याबाबत विचार करतील. यासह कंपनीचे संचालक अधिकृत भांडवल वाढविण्याबाबत चर्चा करू शकतात. मागील 4 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 4000 टक्के परतावा कमावून दिला आहे. 10 जुलै 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.09 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 1100 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 60 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यात या कंपनीचे शेअर्स 55 टक्के मजबूत झाले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 284 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 137.55 रुपये होती. शंकर शर्मा यांनी बिगब्लॉक कन्स्ट्रक्शन कंपनीचे 3.65 लाख शेअर्स खरेदी केले होते. त्यांची सरासरी खरेदी किंमत 235 रुपये होती. यासाठी शंकर शर्मा यांनी एकूण 8.57 कोटी रुपये गुंतवणूक केली होती. बिगब्लॉक कन्स्ट्रक्शन कंपनीचे मुख्यालय सुरत येथे आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bigbloc Share Price NSE Live 06 July 2024.

हॅशटॅग्स

Bigbloc Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x