
IRFC Share Price | आयआरएफसी म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन या सरकारी रेल्वे कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. आज शेअर बाजाराची सुरुवात जबरदस्त विक्रीच्या दबावात झाली आहे. तरीही आज हा स्टॉक तेजीत वाढत आहे. मात्र मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरएफसी कंपनीचे शेअर्स 12 टक्क्यांच्या वाढीसह 146.69 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरएफसी कंपनीचे शेअर्स 130.11 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 25.45 रुपये होती. आज बुधवार दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 0.70 टक्के वाढीसह 142.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
मागील 6 महिन्यांत आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 350 टक्के जास्त नफा कमावून दिला आहे. 17 जुलै 2023 रोजी आयआरएफसी कंपनीचे शेअर्स 32.47 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 16 जानेवारी 2023 रोजी 146.69 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
मागील एका महिन्यात आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 55 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात आयआरएफसी कंपनीचे शेअर्स 94.36 रुपये किमतीचा वाढून 146.69 रुपये किमतीवर पोहचले आहेत.
मागील 10 महिन्यांत आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 470 टक्के परतावा कमावून दिला आहे. 28 मार्च 2023 रोजी आयआरएफसी कंपनीचे शेअर्स 25.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 16 जानेवारी 2024 रोजी या रेल्वे कंपनीचे शेअर्स 146.69 रुपये किमतीवर पोहोचले होते. नवीन वर्षाची सुरुवात होऊन काही आठवडेच झाले आहे, मात्र या काळात देखील आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सने लोकांना 45 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.
मागील 3 वर्षात आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 485 टक्के परतावा कमावून दिला आहे. आयआरएफसी ही मिनीरत्न दर्जा असलेली एक सरकारी कंपनी आहे. ही कंपनी केंद्रीय रेल्वे मंत्रालया अंतर्गत काम करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.