15 December 2024 1:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

Post Office Money | एटीएम नसताना आता नो टेंनशन, पोस्टमन देणार तुम्हाला घरपोच पैसे, या सेवेचा जरूर लाभ घ्या

Post Office Money

Post Office Money | शहरात राहणा-यांना पैसे काढण्यासाठी किंवा एखाद्याला पाठवण्यासाठी यूपीआय, एटीएम असे पर्याय असतात. त्यामुळे कोणताही व्यवहार सहज शक्य होतो. मात्र खेड्यापाड्यात अजूनही नेटवर्कची सुविधा नाही. त्यामुळे यूपीआय किंवा गूगल पे सारखे पर्याय तेथील व्यक्तींना वापरता येत नाहीत. तसेच जागोजागी एटीएमची सुविधाही नाही.

यामुळे काही अडचणीत असताना किंवा तात्काळ पैशांची गरज असताना ग्रामिण नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच पैसे काढण्यासाठी त्यांच्याकडे बॅंक किंवा पोस्ट असे दोनच पर्याय शिल्लक असतात. यातून पैसे मिळवण्यासाठी बराच वेळ जातो. त्यामुळे मोठी गैरसोय होते.

नागरिकांची होत असलेली हिच गैरसोय लक्षात घेत पोस्टाने एक नविन योजना आणली आहे. या योजनेतून तुम्हाला घरपोच पैसे दिले जातात. त्यासाठी तुमचा आधार क्रमांक आणि आधार कार्डला लिंक असलेला संपर्क क्रमांक द्यायचा असतो. तर आता या योजनेत कसे सहभागी व्हायचे आणि तात्काळ पैसे कसे मिळवायचे या विषयी या बातमीतून अधिक जाणून घेऊ.

या योजनेत सहभागी होताना तुम्हाला आधार क्रमांकासह तुमचा लिंक असलेला नंबर आणि बोटांचे ठसे द्यावे लागतात. यात तुमच्या बॅंक खात्याचा क्रमांक देखील दिला जातो. यामार्फत तुम्ही तुमच्या गावातील पोस्टमनकडे यासाठी मागणी करू शकता.

पैसे काढण्यासाठी तुम्हाला पोस्टमनला तुमचा खाते क्रमांक आणि त्यांच्याकडे असलेल्या मशीनवर बोटांचे ठसे द्यायचे आहेत. यातून एक व्यक्ती एका दिवसात १० हजारांपर्यंत रक्कम काढू शकतात. तसेच यासाठी तुमचे आधार कार्ड बंधनकारक आहे. या योजनेत आता पर्यंत १ हजार ६०३ कोटी रुपयांचे व्यवहार करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र सर्कलच्या मुख्य पोस्ट मास्टर वीणा श्रीनिवास यांनी या विषयी सांगितले आहे की, या योजनेचा सर्वच ग्रामीण नागरिक लाभ घेत आहेत. यामुळे बॅंकांना थेट खातेदाराच्या दारात जाण्याची संधी मिळते. अडचणीच्या काळात तात्काळ पैसे मिळवता येतात. शेतकरी वर्गाला याने पैसे मिळवण्याचा मार्ग सोपा झाला आहे. यात नागरिकांचा जास्तीचा वेळ देखील वाचतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Post Office Money Now no tension when there is no ATM postman will give you money at home 03 November 2022.

हॅशटॅग्स

#Post Office Money(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x