
IRFC Share Price | आयआरएफसी म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीने सोमवारी आपले आर्थिक वर्ष 2023-24 च्या मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. यात कंपनीने त्यांचा तिमाही निव्वळ नफा 34 टक्क्यांनी वाढून 1,717.3 कोटी रुपये नोंदवला गेला असल्याची माहिती दिली आहे. ( इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी अंश )
महसूल उत्पन्न वाढल्याने कंपनीचा नफा वाढल्याची माहिती कंपनीने दिली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील या रेल्वे कंपनीने मागील आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीत 1,285.2 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. आज बुधवार दिनांक 22 मे 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 2.93 टक्के घसरणीसह 174.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
जानेवारी-मार्च 2024 तिमाहीत आयआरएफसी कंपनीने 6,477.9 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर मागील वर्षी याच तिमाही कालावधीत कंपनीने 6,230.2 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. जानेवारी ते मार्च तिमाहीमध्ये कंपनीचा खर्च 4,760.6 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षी हाच खर्च 4,945 कोटी रुपये होता.
कंपनीच्या संचालक मंडळाने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 70 पैसे प्रति शेअर अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातून 50,000 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.
शनिवारच्या विशेष ट्रेडिंगमध्ये आयआरएफसी स्टॉक 10 टक्के वाढीसह 173 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील पाच दिवसात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 18.37 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 420 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर 33 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचले आहेत. मागील पाच वर्षांत आयआरएफसी स्टॉक तब्बल 600 टक्के मजबूत झाला आहे. तर मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 125.50 टक्क्यांनी वाढली आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 192.80 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 31.21 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,26,346.52 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.