
IRFC Share Price | आयआरएफसी या सरकारी रेल्वे कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसांपासून मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. मीडिया रिपोर्टनुसार आयआरएफसी ही कंपनी आता 3000 कोटी रुपये मूल्याचे बाँड जारी करणार आहे. कंपनी हे बाँड 26 फेब्रुवारी 2024 रोजी जारी करण्याची शक्यता आहे. शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 0.59 टक्के वाढीसह 153.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
आयआरएफसी कंपनीच्या बाँडची बेस प्राइस 500 कोटी रुपये असून त्यात 2500 कोटी रुपये मूल्याच्या ग्रीनशूचा पर्याय देखील असेल. हे बाँड 10 वर्षांनंतर म्हणजेच 28 फेब्रुवारी 2035 रोजी मॅच्युअर होतील. ग्रीनशू ऑप्शनला मिळणारा प्रतिसाद पाहून आयआरएफसी कंपनी निश्चित रकमेपेक्षा जास्त भांडवल उभारणी करू शकते. आयआरएफसी कंपनीच्या या बाँडला CRISIL, ICRA आणि CARE रेटिंगने AAA रेट जारी केली आहे. हे बाँड खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांना किमान 1 कोटी रुपये आणि त्यापुढे 1 लाख रुपयेच्या पटीत गुंतवणूक करता येईल.
डिसेंबर 2023 तिमाहीत आयआरएफसी कंपनीने 6741.86 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या महसूल संकलनात 8.43 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. डिसेंबर तिमाहीत आयआरएफसी कंपनीने 1633.45 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी डिसेंबर तिमाहीत कंपनीने 1604.23 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
मागील 6 महिन्यांत आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 220 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सची किंमत 50 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 450 टक्के परतावा कमावून दिला आहे. आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सची किंमत आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 505 टक्के मजबूत झाली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.