3 May 2024 2:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Stocks To Buy | सुवर्ण संधी! तज्ज्ञांनी निवडले टॉप 5 शेअर्स, झटपट 45 टक्केपर्यंत कमाई होईल PSU Stocks | मल्टिबॅगर सरकारी कंपनीच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'ओव्हरवेट' रेटिंग, पुढची टार्गेट प्राइस मालामाल करणार Yes Bank Share Price | येस बँक शेअरच्या टेक्निकल चार्टनुसार तेजीचे संकेत, मागील 6 महिन्यात 62% परतावा दिला Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून स्टॉक रेटिंग अपग्रेड BHEL Share Price | PSU शेअर सुसाट तेजीत, 1 वर्षात 258% परतावा दिला, अजून एक सकारात्मक अपडेट Tata Motors Share Price | 1 वर्षात 109% परतावा देणाऱ्या टाटा मोटर्स शेअर्समध्ये घसरण, पुढे नुकसान की फायदा?
x

फडणवीसांच्या नागपुरातील मेट्रो ट्रेन प्रचंड तोट्यात, प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने आता वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी सुद्धा उपलब्ध होणार

Nagpur Metro

Nagpur Metro in Loss | देशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला पर्याय म्हणून मोठय़ा शहरांमध्ये मेट्रोचे जाळे विणण्यावर केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारांनी भर दिला असला तरी गेल्या सहा-सात वर्षांत सुरू झालेले सर्वच मेट्रो प्रकल्प हे आर्थिकदृष्टय़ा तोटय़ात आहेत. प्रकल्प अहवाल तयार करताना अपेक्षित धरण्यात आलेली प्रवासी संख्या आणि प्रत्यक्ष प्रवासी यात मोठी तफावत आढळली आहे.

मुंबईत २०१४ मध्ये घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा हा पहिला मेट्रो मार्ग सुरू झाला. प्रवासी संख्येत वाढ झाली तरी अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीच्या वतीने चालविण्यात येणारा हा प्रकल्प आर्थिकदृष्टय़ा तोटय़ात आहे. यातूनच मध्यंतरी मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाकडे हा प्रकल्प हस्तांतरित करण्यासाठी राज्य सरकारवर दबाव आला होता.

संसदीय समितीने सर्व मेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून तोटय़ाची विचारणा केली होती. बहुतांश प्रकल्प हे २०१६-१७ पासून सुरू झाले. मेट्रो प्रकल्प सुरू करण्यापूर्वी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जातो. त्यात आर्थिक गणित, प्रवासीसंख्या, कर्जाची परतफेड आदी साऱ्यांचा आढावा घेतला जातो. पण सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करताना सरकारी यंत्रणांचे नियोजन चुकल्याचा ठपका संसदीय समितीने ठेवला होता.

दरम्यान, हजारो कोटी रुपये खर्च करून नागपूर मेट्रोला प्रवाश्यांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे मेट्रो ने आता आपली मेट्रो ट्रेन प्रवाश्यांना वाढदिवसासाठी किंवा अन्य सेलिब्रेशनसाठी उपलब्ध करून दिली आहे. नागपूर मेट्रोतर्फे प्रवाश्यांना आकर्षित करण्यासाठी ‘सेलिब्रेशन ऑन व्हील्स’ही संकल्पना राबविण्यात येत असुन या अंतर्गत प्रवासी वाढदिवस, किटी पार्टी, प्री वेडिंग शुट्स, फॅशन शो किंवा अन्य सेलिब्रेशनसाठी तीन डब्यांची मेट्रो 5 हजार रुपये देऊन बुक करू शकतात. यामध्ये नागपुरातील सीताबर्डी इंटरचेंज येथून खापरी स्टेशन अथवा लोकमान्य नगर स्टेशन पर्यंत प्रवासी मेट्रोमध्ये आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत सेलिब्रेशन करू शकतात.

‘सेलिब्रेशन ऑन व्हील्स’ :
मध्यंतरी सेलिब्रेशन ऑन व्हील्स ही संकल्पना नागपूर मेट्रो तर्फे बंद करण्यात आली होती, कारण काही असामाजिक तत्त्वांनी सेलिब्रेशनच्या नावावर मेट्रोमध्ये गोंधळ घातला होता. परंतु नागपूर मेट्रो ने सेलिब्रेशन ऑन व्हील्स सेवा पुन्हा सुरू केली आहे.

नागपूर मेट्रोच्या जनसंपर्क विभागाकडून प्रसार माध्यमांना जी माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यानुसार विक डेज ला मेट्रोची रायडरशिप 75 हजार प्रतिदिन असल्याचा दावा मेट्रो ने केला आहे. परंतु नागपूर मेट्रोला प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर अपेक्षित रायडरशिप ही दीड लाख असल्याचे सांगितले गेले आहे. नागपूर मेट्रोचे सध्या 3 रिच सुरू झाले असून त्यात खापरी स्टेशन ते बर्डी स्टेशन आणि बर्डी स्टेशन ते लोकमान्य नगर स्टेशन, आणि सीताबर्डी स्टेशन ते झिरो माईल फ्रीडम पार्क स्टेशनचा समावेश आहे.

नागपूर मेट्रोचे भूमिपूजन 21 ऑगस्ट 2014 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनची स्थापना करण्यात आली आणि त्यामाध्यमातून नागपूर मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली. केंद्र आणि राज्य सरकार अश्या दोघांच्या भागीदारी आणि विदेशी वित्तीय संस्थांचे कर्ज यातून मेट्रो उभी राहिली.

नागपूर महापालिकेला सुद्धा आर्थिक फटका :
महामेट्रोच्या प्रकल्पामुळे रस्त्यांवरील मोक्‍याच्या जागा गमवाव्या लागल्याने महा-पालिकेच्या जाहिरात विभागाचे वार्षिक ६० लाखांचे उत्पन्न कायमचे बंद झाले. उत्पन्नवाढीसाठी महापालिका धावाधाव करीत असताना मनपाच्या तिजोरीला चांगलाच फटका बसला आहे. परिणामी आता जाहिरात विभागाने दुकानांवरील फलकावर लक्ष केंद्रित केले असून, यातून जास्तीत जास्त उत्पन्नावर भर दिला जात आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Nagpur Metro in heavy loss due to less response from public check details 28 September 2022.

हॅशटॅग्स

#Nagpur Metro(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x