
IRFC Share Price | बुधवार, 22 जानेवारी 2025 रोजी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी शेअर 1.57 टक्क्यांनी घसरून 140.15 रुपयांवर पोहोचला होता. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 1,83,208 कोटी रुपये आहे. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 229 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 116.65 रुपये होती.
आयआरएफसी कंपनी शेअरची ट्रेडिंग रेंज
29 जानेवारी 2021 रोजी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी शेअर 24.80 रुपयांवर ट्रेड करत होता. सध्या इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी शेअर 140.15 रुपयांवर पोहोचला आहे. शेअरची मंगळवारची बंद किंमत 142.39 रुपये होती. बुधवारी दिवसभरात हा शेअर 136.71 रुपये ते 142.75 रुपये या रेंजमध्ये ट्रेड करत होता. मागील एक वर्षात हा शेअर 116.65 रुपये ते 229 रुपये या रेंजमध्ये ट्रेड करत होता.
आयआरएफसी कंपनी शेअरबाबत तज्ज्ञांचा सल्ला
मेहता इक्विटीज ब्रोकरेज फर्मचे स्टॉक मार्केट तज्ज्ञ रियांक अरोरा यांनी आयआरएफसी शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. मागील ६ महिन्यात आयआरएफसी शेअर 31.49 टक्क्यांनी घसरला आहे. आता रेल्वे अर्थसंकल्प जवळ आल्याने रेल्वे क्षेत्रासंबंधित शेअर्स फोकसमध्ये आहेत.
आयआरएफसी’च्या शेअर्ससाठी १५० रुपये ही शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस आहे. तसेच तज्ज्ञांनी १३७ रुपयांचा स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला दिला आहे. आयआरएफसी शेअर लॉन्ग टर्ममध्ये मोठा परतावा देऊ शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. आयआरएफसी शेअरसाठी पहिली टार्गेट प्राईस १४६ रुपये आणि दुसरी टार्गेट प्राईस १५९ रुपये देण्यात आली आहे.
आयआरएफसी कंपनी शेअरने किती परतावा दिला
मागील ५ दिवसात इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी शेअर 1.02% घसरला आहे. मागील १ महिन्यात आयआरएफसी कंपनी शेअर 5.17% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 31.49% घसरला आहे. मागील १ वर्षात इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी शेअर 13.11टक्के घसरला आहे. गेल्या ५ वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना 465.12 टक्के परतावा दिला आहे. मात्र YTD आधारावर हा शेअर 6.78% घसरला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.