
IRFC Vs IREDA Share Price | मागील काही महिन्यात शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांनी IRFC आणि IRDEA यासारख्या सरकारी कंपन्यांमध्ये भरघोस गुंतवणूक केली आहे. प्राइम इन्फोबेस फर्मने गोळा केलेल्या माहितीनुसार, किरकोळ गुंतवणूकदारांनी मार्च 2024 तिमाहीत IRFC कंपनीचे 1,533 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स खरेदी केले आहेत.
विशेष म्हणजे IRFC कंपनीकडे शेअर बाजारात फारच कमी फ्री फ्लोट आहे, या कंपनीचा 86 टक्के वाटा अजूनही भारत सरकारने धारण केला आहे. आज बुधवार दिनांक 8 मे 2024 रोजी IRFC स्टॉक 2.30 टक्के वाढीसह 153.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
मागील काही महिन्यात IREDA कंपनीने देखील किरकोळ गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात आकर्षित केले आहे. IRDEA कंपनीचे शेअर्स मागील वर्षी नोव्हेंबर 2023 मध्ये 32 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. किरकोळ गुंतवणूकदारांनी मार्च तिमाहीत IREDA कंपनीचे 1,561 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स खरेदी केले होते.
याशिवाय किरकोळ गुंतवणूकदारांनी मार्च तिमाहीत HDFC बँक , NHPC, ITC यासारख्या स्टॉकमध्ये देखील भरघोस गुंतवणूक केली आहे. आज बुधवार दिनांक 8 मे रोजी IREDA कंपनीचे शेअर्स 2.98 टक्के वाढीसह 172.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
मार्च 2024 तिमाहीत किरकोळ गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केलेल्या शेअरची लिस्ट खालीलप्रमाणे.
* एचडीएफसी बँक : 14,137 कोटी रुपये
* NHPC : 4,842 कोटी रुपये
* आयटीसी : 2,213 कोटी रुपये
* जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस : 2.118 कोटी रुपये
* टाटा मोटर्स : 1,948 कोटी रुपये
* झी एंटरटेन्मेंट : 1,900 कोटी रुपये
* येस बँक : 1.708 कोटी रुपये
बंधन बँक : 1579 कोटी रुपये
* IREDA : 1561 कोटी रुपये
* IRFC : 1533 कोटी रुपये
मार्च 2024 तिमाहीत किरकोळ गुंतवणूकदारांनी अनेक लार्जकॅप स्टॉकमध्ये विक्री केली आहे. यामधे रिलायन्स इंडस्ट्रीज , टीसीएस , इन्फोसिस , बीपीसीएल , आयसीआयसीआय बँक आणि विप्रो स्टॉक सामील आहेत. मार्च तिमाहीत कोणत्या कंपन्यांमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांनी मोठी विक्री केली होती, याचे तपशील खालीलप्रमाणे.
* रिलायन्स इंडस्ट्रीज : 4.691 कोटी रुपये
* बजाज होल्डिंग्ज : 3.635 कोटी रुपये
* पर्सिस्टंट सिस्टम्स : 2,936 कोटी रुपये
* TCS : 2.018 कोटी रुपये
* इन्फोसिस : 1,717 कोटी रुपये
* बीपीसीएल : 1,330 कोटी रुपये
* IRCTC : 1,064 कोटी रुपये
* विप्रो : 928 कोटी रुपये
* आयसीआयसीआय बँक : 917 कोटी रुपये
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.