
IRFC Vs RailTel Share | रेलटेल कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3 टक्क्यांच्या वाढीसह 219.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. स्टॉकमध्ये अचानक वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला 68 कोटी रुपये मूल्याची एक ऑर्डर प्राप्त झाली आहे.
जम्मू स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनीसाठी एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटरसाठी डेटा सेंटर आणि डिझास्टर रिकव्हरी सेंटरचे डिझाइन, पुरवठा, स्थापना, चाचणी, कमिशनिंग आणि ऑपरेशन संबंधित कामे कंपनीला मिळाले आहेत. शुक्रवार दिनांक 7 ऑक्टोबर 2023 रोजी रेलटेल कंपनीचे शेअर्स 1.77 टक्के वाढीसह 218.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
वर्क ऑर्डर तपशील
2023 या वर्षाच्या सुरुवातीला रेलटेल कंपनीला पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनीकडून 700 कोटी रुपये मुक्याची वर्क ऑर्डर प्राप्त झाली होती. त्याच महिन्यात रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीला भारतीय रेल्वेच्या प्रवासी आरक्षण प्रणालीसाठी क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरच्या खरेदीसाठी सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टमकडून 78.58 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर प्राप्त झाली होती.
गुंतवणुकीवर परतावा
YTD आधारे रेलटेल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 70 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 109 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात रेल टेल कंपनीच्या शेअरची किंमत 92 टक्के वाढली आहे. तर स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स सध्या 52.4 अंकावर आहे. याचा अर्थ शेअर सध्या ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाही.
स्टॉकचा एक वर्षाचा बीटा 1 आहे, यावरून स्टॉकमध्ये सरासरी अस्थिरता पाहायला मिळत आहे. रेलटेल स्टॉक सध्या आपल्या 20 दिवसांच्या मूव्हिंग सरासरी, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग सरासरी किमतीच्या वर ट्रेड करत आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.