
IRFC Vs RVNL Share | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत पाहायला मिळत आहेत. नुकताच या सरकारी कंपनीला एकाच दिवसात 3 मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. आरव्हीएनएल कंपनीने या 3 कॉन्ट्रॅक्टसाठी सर्वात कमी बोली लावली होती. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
यामध्ये एक कॉन्ट्रॅक्ट सालासर टेक्नो इंजिनीअरिंग कंपनीसोबत संयुक्त उपक्रम म्हणून पूर्ण करायचा आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आरव्हीएनएल स्टॉक किंचित विक्रीच्या दबावात ट्रेड करत होता. गुरूवारी 28 मार्च 2024 रोजी दिवसाअखेर आरव्हीएनएल स्टॉक 1.48 टक्के घसरणीसह 252.20 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
नुकताच आरव्हीएनएल कंपनीला दक्षिण पूर्व रेल्वे विभागाकडून इलेक्ट्रिक ट्रॅक्शन सिस्टमच्या अपग्रेडेशनसाठी डिझाइन, पुरवठा, चाचणी आणि कमिशनिंगशी संबंधित कामाचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. या कॉन्टॅक्टचे एकूण मूल्य 148.26 कोटी रुपये असून हे काम 18 महिन्यांत पूर्ण करायचे आहे.
यासह कंपनीला उत्तर-पूर्व सीमावर्ती रेल्वे प्रकल्पासाठी 95.95 कोटी रुपये मूल्याचे काम देण्यात आले आहे. हे काम पुढील 240 दिवसांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. यासह आरव्हीएनएल आणि सालासर टेक्नो इंजिनियरिंग कंपनीच्या संयुक्त उपक्रमाला एनर्जी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने 45.8 MW क्षमतेच्या प्लांटची रचना, उपकरण पुरवठा हा संबंधित 7.15 दशलक्ष डॉलर्स मूल्याचे काम दिले आहे. या संयुक्त उपक्रमात आरव्हीएनएल कंपनीचा वाटा 49 टक्के असेल.
मागील एका वर्षात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 277 टक्के नफा कमावून दिला आहे. 29 मार्च 2023 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 67.07 रुपये किमतीवर व्यवहार करत होते. तर 28 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 252.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 50 टक्क्यांनी वाढवले आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 345.60 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 64.66 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.