15 December 2024 2:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Quick Money Shares | कमाई करायची आहे? 57 टक्के परतावा मिळेल, या शेअरची लिस्ट सेव्ह करा

Quick Money Shares

Quick Money Shares | जगात अनेक देशात भू-राजकीय तणाव निर्माण झाले आहेत, या राजकीय हालचाली, युद्ध , आर्थिक मंदी यामुळे फक्त भारतीय शेअर बाजार नाही जगातील सर्व स्टॉक मार्केट अस्थिर झाले आहेत. आता सर्व कंपन्यांचे सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर होत आहे. शेअर बाजारात चढ-उतार आणि मंदी असताना काही दर्जेदार स्टॉक्स असे आहेत, ज्यांनी दीर्घकालीन गुंतवणुक करून पैसे कमविण्याची संधी निर्माण केली आहे. अनेक कंपन्यांचे शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये उत्तम प्रदर्शन करत आहेत. ब्रोकरेज कंपन्यांनी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी काही शेअर्स निवडले आहेत, जे दीर्घकाळात गुंतवणुकदारांना 57 टक्के परतावा मिळवून देऊ शकतात.

सुदर्शन केमिकल :
ब्रोकरेज फर्म आनंदराठीने लोकांना सुदर्शन केमिकल या कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावण्याचा सल्ला दिला आहे. आनंद राठी फर्मने या कंपनीच्या शेअर्सवर 500 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. 16 नोव्हेंबर, 2022 रोजी या कंपनीचा शेअर 383.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार जर तुम्ही या स्टॉकमध्ये सध्याच्या किमतीनुसार पैसे लावले तर दीर्घकाळात तुम्ही 28 टक्के परतावा कमवू शकता. हे स्टॉक पुढील काळात 112 रुपये अधिक वाढण्याची शक्यता आहे.

ग्रीनपॅनेल इंडस्ट्रीज :
ब्रोकरेज फर्म आनंदराठीने ग्रीनपॅनेल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने या कंपनीच्या स्टॉकसाठी 571 रुपये लक्ष किंमत निर्धारित केली आहे. 16 नोव्हेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर 357.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्याच्या बाजार भावाने तुम्ही या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला प्रति शेअर 200 रुपयांपेक्षा अधिक परतावा मिळू शकतो, याचा अर्थ तुम्हाला 57 टक्के पेक्षा जास्त परतावा मिळेल.

Emami :
प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म “नुवामा वेल्थने” इमामी कंपनीच्या स्टॉकमध्ये पैसे लावण्याचा सल्ला दिला आहे. नुवामा वेल्थने या कंपनीच्या शेअर्सवर 594 रुपये प्रति शेअर्स लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. 16 नोव्हेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 439 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्याच्या किमतीवर जर तुम्ही हे स्टॉक खरेदी केले तर तुम्हाला पुढील काळात प्रति शेअर 138 रुपये नफा मिळू शकतो. गुंतवणूकदार दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करून या स्टॉकमधून 30 टक्के नफा कमवू शकता.

Eclerx Services :
ब्रोकरेज फर्म नुवामा वेल्थने Eclerx Services कंपनीच्या स्टॉकमध्ये पैसे लावण्याचा सल्ला दिला आहे. नुवामा वेल्थने या कंपनीच्या शेअर्सवर 2,129 रुपये ही लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. 16 नोव्हेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर 1436 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही या कंपनीच्या शेअर्समध्ये सध्याच्या किमतीवर गुंतवणूक केली तर पुढील काळात तुम्हाला या शेअर्सवर 712 रुपये प्रति शेअर नफा मिळू शकतो. म्हणजेच तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 50 टक्के अधिक वाढेल.

इंडियन हॉटेल्स :
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअर्सवर पैसे लावण्याचा सल्ला दिला आहे. मोतीलाल ओसवाल यांनी या कंपनीच्या शेअरवर 365 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. 16 नोव्हेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर 308.80 रुपयेवर ट्रेड करत होते. जर गुंतवणूकदारांनी या शेअरमध्ये पैसे लावले तर त्यांना 53 रुपयेचा नफा होऊ शकतो. म्हणजे गुंतवणूकदारांचे पैसे 17 टक्के अधिक वाढतील.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Quick Money Shares Recommended by famous Brokerage firm for long term investment and huge returns on 17 November 2022.

हॅशटॅग्स

Quick Money Shares(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x