
IRFC Vs RVNL Share Price | आयआरएफसी आणि आरव्हीएनएल या दोन्हीही रेल्वे कंपन्यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी (NSE: IRFC) पाहायला मिळत आहे. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किंमत पातळीवरून 20.2 टक्के घसरले आहेत. तर इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किंमत पातळीवरून 32.4 टक्के घसरले आहेत. शेअर बाजारातील तज्ञांनी या दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये पुढील 5-10 वर्षांमध्ये 3-5 पट वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
आज मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी आयआरएफसी कंपनीचे शेअर्स 1.90 टक्के घसरणीसह 155.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तर आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 1.21 टक्के घसरणीसह 525 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
आरव्हीएनएल शेअरबाबत :
जून 2024 तिमाहीत आरव्हीएनएल कंपनीने निव्वळ नफ्यात लक्षणीय घट नोंदवली होती. तसेच कंपनीच्या विक्रीमध्येही तिमाही-दर-तिमाही आधारावर घट झाली आहे. दीर्घकालीन दृष्टीकोनातून कंपनीच्या विक्रीमध्ये 10-12 टक्के वाढ अपेक्षित आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते गुंतवणूकदारांनी हा स्टॉक खरेदी करताना 480 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावणे आवश्यक आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 540-550 रुपये किमतीवर जाऊ शकतो.
आयआरएफसी शेअरबाबत :
जून तिमाहीत आयआरएफसी कंपनीच्या विक्रीत वाढ झाली आहे. तथापि कंपनीच्या नफ्यात तिमाही-दर-तिमाहीत किरकोळ घट झाली आहे. मागील काही वर्षात आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सची किंमत 30 रुपयेवरून वाढून 229 रुपये किमतीवर पोहोचले आहे. या कंपनीच्या शेअरने 150 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. जर हा स्टॉक सपोर्ट लेव्हलच्या खाली घसरला तर शेअरमध्ये विक्रीचा दबाव वाढू शकतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.