26 January 2025 2:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | पीएसयू इरेडा शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Property Knowledge | 90% कुटुंबांना माहित नाही, लग्नानंतरही विवाहित मुलगी वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क मागू शकते, कायदा लक्षात ठेवा Income Tax Returns | नोकरदारांनो, टॅक्स वाचवण्यासाठी पती-पत्नी जॉईंट ITR भरू शकतात, जाणून घ्या त्याचे फायदे Govt Employees Pension | पेन्शन ₹9,000 वरून 25,740 रुपये होणार, तर बेसिक सॅलरी ₹18,000 वरून 51,480 रुपये होणार EPFO Passbook | पगारदारांनो आता नवे नियम, पैसे काढणे, अकाऊंट ट्रान्सफर, प्रोफाईल अपडेटचे नियम बदलले, जाणून घ्या नियम New Income Tax Regime | गुडन्यूज, 10 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त, 25 टक्क्यांचा नवा टॅक्स स्लॅब जाहीर होण्याची शक्यता
x

IRFC Vs RVNL Share | IRFC आणि RVNL सह सर्व रेल्वे शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग सुरू, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? फायदा होईल?

IRFC Vs RVNL Share price

IRFC Vs RVNL Share | भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या रेल्वे स्टॉकमध्ये कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. यामध्ये IRCTC लिमिटेड, IRFC लिमिटेड, IRCON इंटरनॅशनल लिमिटेड, रेल विकास निगम लिमिटेड यासारखे स्टॉक सामील आहेत. सलग काही दिवसांच्या तेजीनंतर दोन ट्रेडिंग सेशनमध्ये रेल्वे स्टॉक प्रॉफिट बुकिंगला बळी पडले होते.

आता मात्र त्यात पुन्हा सुधारणा पाहायला मिळत आहे. रेल विकास निगम कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत होती, कारण कंपनीने पश्चिम रेल्वे विभागाच्या 245 कोटी रुपये मूल्याच्या प्रोजेक्टसाठी सर्वात कमी बोली लावली होती. त्यामुळे कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट मिळण्याची शक्यता वाढली आहे.

आज शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी IRFC कंपनीचे शेअर्स 2.09 टक्के घसरणीसह 79.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तर RVNL कंपनीचे शेअर्स 0.94 टक्के घसरणीसह 169.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

IRCTC कंपनीने बुधवारी एका निवेदनाद्वारे माहिती दिली की, IRCTC कंपनीच्या बस तिकीट प्लॅटफॉर्मवरून बसेसचे बुकिंग सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. मागील पाच वर्षात IRCTC कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 347 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 15 टक्के वाढली आहे.

मागील काही दिवसापासून रेल्वे कंपनीच्या शेअर्समध्ये नफा वसुली पाहायला मिळत आहे. IRCTC, RailTel, RVNL, IRCON आणि IRFC यासारख्या रेल्वे पायाभूत सुविधा प्रदान करणाऱ्या कंपनीच्या शेअरची किंमत वार्षिक 80-150 टक्क्यानी वाढली आहे. मात्र आता शेअर बाजारातील तज्ञांनी रेल्वे स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉक मध्ये आणखी प्रॉफिट बुकींग पाहायला मिळू शकते असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Vs RVNL Share price today on 15 September 2023.

हॅशटॅग्स

IRFC Vs RVNL Share price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x