
ITC Share Price| ‘ITC लिमिटेड’ या FMCG क्षेत्रातील कंपनीची पुढील काळात सकारात्मक दिशेने चालू राहू शकते, असा अंदाज ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल सिक्युरिटीजने व्यक्त केला आहे. कंपनीचे स्वस्त मूल्यांकन आणि आकर्षक लाभांश यिल्डमुळे येणाऱ्या तिमाहीत ही कंपनी मजबूत कमाई करेल असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. ब्रोकरेज फर्मने ITC कंपनीच्या शेअरवर प्रति शेअर 450 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. 10 मार्च 2023 रोजी आयटीसी कंपनीचे शेअर्स 0.18 टक्के वाढीसह 388.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ट्रेडिंग सेशन दरम्यान आयटीसी स्टॉक 389 रुपयांवर पोहचला होता. 2023 या वर्षात आयटीसी कंपनीच्या शेअरने लोकांना 17 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात आयटीसी कंपनीच्या शेअरने 67 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 394 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 227.85 रुपये होती.
मोतीलाल ओसवाल फर्मने म्हटले आहे की, स्टेपल आणि विवेकाधीन श्रेणींमध्ये एफएमसीजी क्षेत्र संघर्ष करत असताना आयटीसी कंपनीच्या स्टॉकने मजबूत वाढ नोंदवली आहे. ITC कंपनीचे मूल्यांकन आर्थिक वर्ष FY24 EPS च्या 22.2 पट आणि FY25 EPS च्या 20 पट कमी आहे. एफएमसीजी क्षेत्रातील यादिग्गज कंपनीच्या स्टॉकमधील वाढीबाबत ब्रोकरेज फर्म सकारात्मक आहेत.
मोतीलाल ओसवाल फर्म चे तज्ञ म्हणतात की, पुढील तिमाहीत आयटीसी कंपनीच्या सिगारेटची स्थिर वाढ होत राहील. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतासह जगभरातील सर्व शेअर बाजार लाल निशाणीवर ट्रेड करत होते. आर्थिक वर्ष 2023-2024 च्या अर्थसंकल्पात अप्रत्यक्ष करात कोणतीही लक्षणीय वाढ न झाल्याने ITC कंपनीसाठी ऑपरेटिंग वातावरण मागील वर्षांच्या तुलनेत खूपच अनुकूल आहे. FY24 च्या राष्ट्रीय अर्थसंकल्पात चारही फिल्टर सिगारेट श्रेणींवरील राष्ट्रीय आपत्ती आकस्मिक शुल्कमध्ये 15-16 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. तथापि या विभागांमधील एकूण NCCD एकूण अप्रत्यक्ष कर आकारणीच्या 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे, जे MRP च्या 60 टक्के आहे.
गेल्या पाच-सहा तिमाहीत आयटीसी कंपनीने आपल्या उत्पादनाच्या किंमतींचा मजबूत फायदा घेतला आहे. मोतीलाल ओसवाल फर्मचे तज्ञ म्हणाले की, रब्बी कापणीनंतर गव्हाच्या किमती झपाट्याने खाली येतात, त्यामुळे विभागीय मार्जिन आघाडीवर कंपनीच्या कामगिरीमध्ये आणखी सुधारणा होऊ शकते. आर्थिक वर्ष FY24 बाबत मोतीलाल ओसवाल म्हणाले की, आयटीसी कंपनीच्या हॉटेल व्यवसायात मजबूत वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. आयटीसी कंपनी मागील दोन वर्षांपासून उत्पन्न वाढीच्या बाबतीत आपल्या स्पर्धक कंपनीच्या तुलनेत उत्तम कामगिरी करत आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.