
Jai Balaji Share Price | जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. अवघ्या एका वर्षात जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट वाढवले आहेत. अवघ्या एका वर्षभरात या कंपनीचे शेअर्स 60 रुपयेवरून वाढून ते 1000 रुपये किमतीवर पोहचले आहेत. ( जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनी अंश )
मागील एका वर्षात जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1714 टक्के नफा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी जय बालाजी इंडस्ट्रीज स्टॉक 0.98 टक्के घसरणीसह 1,075.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
28 एप्रिल 2023 रोजी जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 59.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 27 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1085 रुपये किमतीवर पोहचले होते. ऑक्टोबर 2023 मध्ये जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने 500 रुपये किंमत पार केली होती.
मागील 6 महिन्यांत जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 88 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1314 रुपये होती. तर नीचांकी किंमत पातळी 52.35 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 18,744.48 कोटी रुपये आहे.
25 एप्रिल 2024 रोजी जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनीने आपले मार्च 2024 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. मागील आर्थिक वर्षात जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनीने 879.57 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये या कंपनीने 6,413.78 कोटी रुपयेची सर्वाधिक विक्री साध्य केली होती. जय बालाजी कंपनीने मार्च तिमाहीत 272.98 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीला 13.08 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. 2023-24 या आर्थिक वर्षात कंपनीने 7.05 टक्के वाढीसह 1,845.60 कोटी रुपये वार्षिक विक्री साध्य केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.