 
						Jandhan Bank Account | जर तुमचंही जनधन अर्थात झिरो बॅलन्स असलेले बँक खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण याच जनधन बँक खात्यांचा आधार घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक इव्हेंटमध्ये दावा करतात की आमचं सरकार आल्यानंतर करोडो लोकांना बँक अकाउंट काय असतं ते समजलं आहे. परंतु एका अत्यंत मोठ्या व्यक्तीने याविषयावर भाष्य केल्याने हा विषय केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी राजकीय मार्केटिंगचा मुद्दा म्हणून शिल्लक आहे का याची चर्चा सुरु होऊ शकते.
होय! देशातील करोडो लोकांच्या वतीने अशा खात्यांचा वापर पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. याचे कारण इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि अध्यक्ष नंदन निलेकणी यांनी दिले आहे. नीलेकणी म्हणाले की, बँकांकडून आकारल्या जाणाऱ्या विविध शुल्कांमुळे लोक ‘झिरो बॅलन्स’ बँक खात्यांचा वापर करत नाहीत.
जनधन खात्यांचा व्यवहारांसाठी फारसा वापरच होत नाही
या समस्येवर तोडगा काढणे महत्त्वाचे आहे, कारण इतर देशही त्याचे अनुकरण करू शकतात, असे निलेकणी म्हणाले. खरे तर गेल्या काही वर्षांत सरकार आणि बँकांनी सातत्याने राबविलेल्या मोहिमेमुळे देशातील लोकसंख्येच्या मोठ्या भागाची खाती बँकांमध्ये उघडण्यात आली आहेत. परंतु मिनिमम बॅलन्सच्या अडचणीमुळे असलेल्या या बँक खात्यांचा व्यवहारांसाठी लोकांकडून फारसा वापर होत नाही.
बँका व्यवहारांवर शुल्क वसुली करतात
ग्लोबल एसएमई फायनान्स फोरमला संबोधित करताना निलेकणी पुढे म्हणाले की, अनेक बँक खात्यात पैसे जमा असूनही लोक व्यवहार करत नाहीत. याचे कारण म्हणजे बँकांकडून व्यवहारांवर होणारी शुल्क वसुली. अनेक ठिकाणी या मूलभूत बँक खात्यांचे कामकाज आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नसल्याचे दिसून येत आहे. या खात्यांवर अनेक प्रकारचे शुल्क लावण्यात आले आहे. अशा तऱ्हेने देशातील लोकांनी या अकाऊंटचा वापरच बंद केला आहे.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		