15 December 2024 2:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
x

Fertilizers and Chemicals Travancore Share Price | जबरदस्त शेअर! दीड महिन्यात 120% परतावा, अल्पावधीत पैसा वाढतोय, स्टॉक डिटेल्स पहा

Fertilizers and Chemicals Travancore Share Price

Fertilizers and Chemicals Travancore Share Price | शेअर बाजारात पडझड सुरू असताना ‘फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर’ कंपनीचे शेअर्स प्रवाहाच्या विरुद्ध आपल्या शेअर धारकांना भरघोस परतावा कमावून देत होते. 1 डिसेंबर 2022 पासून फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर कंपनीचे शेअर्स 120 टक्के वाढले आहेत. या कंपनीचे बाजार भांडवल 20,740 कोटी रुपये आहे. 1 डिसेंबर 2022 पासून ते आतपर्यंत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना बंपर परतावा मिळवून दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Fertilizers & Chemicals Travancore Share Price | Fertilizers & Chemicals Travancore Stock Price | BSE 590024 | NSE FACT)

फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर शेअरची कामगिरी :
या केमिकल कंपनीच्या शेअर्सची किंमत अवघ्या एका महिन्यात 265 रूपयेवरून 320 रुपयेवर गेली आहे. या काळात शेअरची किंमत 20 टक्के वाढली आहे. या केमिकल कंपनीच्या शेअरची किंमत मागील सहा महिन्यांत 101.55 रुपयेवरून वाढून 320 रुपयेवर पोहचली आहे. या कालावधीत फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 215 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या स्टॉकने अंगील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांच्या पैशाचे मूल्य दुप्पट केले आहे. अवघ्या एका वर्षात शेअरची किंमत 147 रुपयेवरून 320 रुपयेवर पोहचली आहे. या काळात गुंतवणूकदारांनी 115 टक्क्यांहून अधिक नफा कमावला आहे. 2023 हे नवीन सुरू झाल्यानंतर या केमिकल कंपनीचे शेअर्सच्या स्टॉकमध्ये प्रॉफिट बुकींग सुरू झाली होती. YTD आधारे वेळेत या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरमध्ये 10 टक्के पडझड पाहायला मिळाली आहे.

फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर कंपनीचे शेअर्स NSE आणि BSE या दोन्ही निर्देशांकावर ट्रेड करत आहेत. गुरुवार दिनांक 19 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.76 टक्के घसरणीसह 372.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या 23,85,361 शेअरची खरेदी विक्री झाली होती. हे प्रमाण मागील 20 दिवसांच्या 42,90,997 या खरेदी विक्री प्रमाणाच्या तुलनेत खूप कमी आहे.

फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 390 रुपये आहे. तर या शेअरची 52 आठवड्याची नीचांक पातळी किंमत 82.35 रुपये आहे. 1 डिसेंबर 2022 रोजी सेन्सेक्स 63,583 या आपल्या विक्रमी उच्चांक पातळीवर पोहचला होता. आज सेन्सेक्स 60858 अंकावर क्लोज झाला आहे. मागील दीड महिन्यांच्या कालावधीत 2,725 अंकांची घसरण पाहायला मिळाली आहे. त्याचप्रमाणे 1 डिसेंबर 2022 रोजी निफ्टी-50 निर्देशांक 18,887 अंकावर ट्रेड करत होता. तर आज nifty-50 18107.85 अंकावर क्लोज झाला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Fertilizers and Chemicals Travancore Share Price 590024 FACT in focus check details on 19 January 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(458)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x